- जाहिरात -spot_img
breaking news

प्रलंबित बिलांवरून ठेकेदार आक्रमक; दिला ‘हा’ इशारा…

१ मे पासून वीज देखभाल कामे बंद करण्याचा इशारा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
इलेट्रिकल कॉन्ट्रॅटर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अहिल्यानगर विभागाने प्रलंबित बिलांचा प्रश्न व महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, १ मे २०२६ पासून एचटी, एलटी व डीटीसी संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व, ब्रेकडाऊन खंडीत देखभाल कामे बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हा निर्णय अमलात आणण्यात येणार असल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले.

असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक महिन्यांपासून विविध कामांची बिल रक्कम प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून, कामकाज सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे.

दरम्यान, महावितरणकडून ऑटो रॉबीन पद्धत कोणतीही स्पष्ट कार्यपद्धती, प्रशिक्षण किंवा पूर्वसूचना न देता लागू करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमध्ये कामांचे वाटप, एमओ/पीओ प्रक्रिया, बिलिंग, पेमेंट सायकल, जबाबदार्‍या तसेच सुरक्षा नियमांविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने ठेकेदारांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे.१ मेपासून देखभाल कामे बंद राहिल्यास जिल्ह्यातील वीज पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शयता व्यक्त होत आहे. विशेषतः सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

ग्राहकांना बसू शकतो फटका
लाईनमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीकरिता अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध नसेल, तर वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होऊ शकतो. परिणामी, वीज ग्राहकांचा रोष महावितरणला सहन करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर १ मेपूर्वीच प्रलंबित बिलांचा प्रश्न निकाली काढून स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, संभाव्य आंदोलनामुळे वीज व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा :  हॉटेलिंग क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संदीप ग्लोबल वेंचर्सच्या 'हॉटेल सचिन'चा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ