- जाहिरात -spot_img
breaking news

बदलत्या हवामानामुळे जलसंधारणाची कामे करा : सुजित झावरे पाटील

गाजदीपूर येथील पाझर तलाव खोलीकरण कामाचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रारंभ

पारनेर | नगर सह्याद्री
बदलत्या हवामानामुळे दुष्काळ व अतिवृष्टीचे संकट वारंवार निर्माण होत असल्याने निसर्गाचा इशारा वेळेत ओळखून जलसंधारणाची कामे हाती घेणे ही काळाची गरज आहे. पाझर तलाव, बंधारे आणि जलसाठे मजबूत केल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी मात करता येईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले.

गाजदीपूर (वडगाव सावताळ) येथील पाझर तलाव खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार असून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. जलसंधारण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या कामासाठी सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत लोकसहभागातून अशा विकासकामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे.

यावेळी युवा नेते स्वप्निल झावरे, राजेंद्र रोकडे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, योगेश रोकडे, दत्ता शिंदे, अमोल शिंदे, इंजि. प्रसाद झावरे, किरण रंधवन, इंजि प्रतीक लोळगे, उत्तम नऱ्हे, दादाभाऊ नऱ्हे, पाटीलनाना सातकर, सागर करगळ, सुभाष करगळ, खंडू कोळेकर, देवका बर्डे, अशोक सातकर, बाळासाहेब सातकर, संतोष करगळ, धनु करगळ, शंकर करगळ, बाबासाहेब काळे, विशाल तिखोळे, विष्णू करगळ, दत्तोबा तिखोळे, चंद्रकांत झिटे, उमेश सातकर, राधु सातकर, गबाजी करगळ, सतिष करगळ, भिरु करगळ, सोमा पवार, केरू करगळ, रोहित करगळ, बाळू गांगुर्डे, संतोष करगळ, मिता तिखोळे, शिवाजी खटके, विकास कोळेकर आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  एसटीचा वर्धापनदिन केक कापून साजरा... आकर्षक रांगोळ्या, फुलांची आरास
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ