- जाहिरात -spot_img
breaking news

मार्च हिटने महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याकडून काय दिलाय अलर्ट

उष्णतेच्या लाटेची शक्यता
मुंबई | नगर सह्याद्री

राज्यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कोरडे आणि निरभ्र हवामान राहणार असून, सामान्य नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास जाणवण्याची शयता व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस कमाल तापमानात सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. १ मार्च रोजी राज्यभर प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज असून ढगाळ हवामान किंवा पावसाची शयता अत्यंत कमी आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू शकतो आणि दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शयता आहे. कोकण विभागात उष्णतेसोबत दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. मुंबई शहरात कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शयता असून किमान तापमान २३ ते २५ अंशांच्या दरम्यान राहू शकते. सकाळी तसेच संध्याकाळीही उष्णतेची जाणीव कायम राहण्याची शयता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. पुण्यात दिवसा तापमान झपाट्याने वाढताना दिसेल, तर रात्री तुलनेने थोडा गारवा जाणवू शकतो.

मात्र दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शयता आहे. वाढते तापमान आणि कोरडे हवामान यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातही तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  सापाला चेचला पाहिजे...; अशोक खरातला मारुन..., भिडे गुरुजी काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ