- जाहिरात -spot_img
breaking news

जान्हवी कपूरवर फिदा झाला शिखर पहाडिया; पहा काय घडलं

मुंवई / नगर सह्याद्री –
अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. दमदार अ‍ॅक्शन, भावनिक कथा आणि वेगळ्या लूकमुळे हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते जान्हवी कपूरच्या भूमिकेने. ट्रेलरमध्ये ती खूप आत्मविश्वासपूर्ण आणि ताकदवान भूमिकेत दिसत असून चाहत्यांकडून तिचं मोठं कौतुक होत आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘पेड्डी’चा ट्रेलर शेअर करत जान्हवीला “रिअल आणि रील लाइफ डॉन” असं म्हटलं. त्याने लिहिलं की, “जान्हवी कपूर खरी आणि पडद्यावरही जबरदस्त आहे. राम चरणही अफलातून दिसत आहेत. तुमच्या दोघांची फिल्म पाहण्याची उत्सुकता आता आवरत नाही.”

शिखरच्या या पोस्टनंतर जान्हवीनेही त्याची स्टोरी रिपोस्ट केली आणि त्यासोबत हार्ट इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचं नाव गेल्या काही वर्षांपासून एकत्र जोडलं जात आहे. दोघे अनेकदा सुट्ट्यांमध्ये, मंदिर दर्शनाला किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र त्यांनी अद्याप अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर आणि बॉलिवूड वर्तुळात हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा कायम असते.

‘पेड्डी’ या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूरसोबत दिव्येंदू शर्मा, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं संगीत प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिलं आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी राम चरण यांनी तब्बल १०० कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘पेड्डी’ हा यंदाच्या सर्वात मोठ्या आणि महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा :  संचिता उगलेचे खासगी चॅट्स लीक; डिप्रेशनचे धक्कादायक कारण समोर

चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना असून ट्रेलरमध्ये राम चरणचा रफ आणि वेगळा अंदाज पाहायला मिळतो. अ‍ॅक्शन आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला हा ट्रेलर सध्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ‘पेड्डी’ हा चित्रपट ४ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून चाहत्यांना आता चित्रपटाची आतुरता लागली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ