- जाहिरात -spot_img
breaking news

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; राज्यात वादळी पावसासह गारपिट, अवकाळीचे सावट

हवामान विभागाचा अंदाज
पुणे / नगर सह्याद्री –
राज्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल झाले आहेत. हवामानतज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाचे संकट मात्र गडद झाले आहे.

दोन-तीन दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढगाळ हवामानामुळे पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणारा असून, दोन-तीन दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल आणि तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

१८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता
विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये २० मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. १८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत २० मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता
मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानातही बदल झाले आहेत. दरम्यान, मुंबईत २० मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  तलाठी भरती आता MPSC घेणार; १७०० हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ