- जाहिरात -spot_img
breaking news

डॉ. वर्धमान कांकरिया ठरले जगातील अव्वल नेत्रतज्ज्ञ; आंतरराष्ट्रीय सन्मान; पहिल्या 50 नेत्रतज्ज्ञांत वर्णी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व लेसर नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. वर्धमान प्रकाश कांकरिया यांना जगातील अतिशय दुर्मिळ उच्च सन्मान मिळाला असून जगातील पहिल्या 50 नेत्रतज्ज्ञात त्यांची वर्णी लागली आहे. डॉ वर्धमान कांकरिया हे एशियन आय हॉस्पिटल पुणेचे संस्थापक असून मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय योगदानासाठी डॉ. कांकरिया यांना हा सन्मान मिळाला आहे.

पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. कांकरिया हे भारतातील आघाडीचे ङडखघ, रोबोटिक मोतीबिंदू आणि दृष्टीदोष सुधारणा शल्यविशारद म्हणून ओळखले जातात. अमेरिकास्थित प्रतिष्ठित जागतिक रँकिंग प्लॅटफॉर्म एुशीीीिंलरशि णड ने ही मानाची यादी जाहीर केली असून, त्यात डॉ. वर्धमान कांकरिया यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित यादीत भारतातील अन्य नामवंत नेत्रतज्ज्ञांमध्ये दिल्लीतील खखचडच् या प्रा. डॉ. नम्रता शर्मा आणि बंगळुरूतील डॉ. रोहित शेट्टी यांचाही समावेश आहे.नेत्रविज्ञान क्षेत्रात 2010 पासून संशोधन, नवकल्पना आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून डॉ. वर्धमान कांकरिया यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एशियन आय हॉस्पिटल स्थापन करून एक लाखापेक्षाही अधिक लेसर नेत्रशस्त्र क्रिया केल्या. त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

तर-30 पर्यंतचा अतिशय मोठा चष्म्याचा नंबर घालवून जगाला मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, वैज्ञानिक प्रकाशने, शैक्षणिक प्रभाव आणि जागतिक स्तरावरील योगदान या निकषांच्या आधारे एुशीीीिंलरशि जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांची निवड व क्रमवारी निश्चित करते. डॉ. वर्धमान कांकरिया यांचे शालेय शिक्षण अहिल्यानगर येथे तर वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, शंकर नेत्रालय चेन्नई व अमेरिकेत विशेष अभ्यास झाला आहे. तसेच जगभर विविध ठिकाणी नेत्र परिषदांमध्येही त्यानी विशेष सहभाग नोंदविला आहे. या जागतिक सन्मानाचे श्रेय ते त्यांच्या आईवडिलांना कुटुंबीयांना एशियन आय हॉस्पिटल ला व सेवेची संधी दिल्यामुळे समाजाला देतात.

डॉ. कांकरिया यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले आहेत. भारतात सर्वाधिक ङडखघ शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. तसेच, मायनस 30 डायॉप्टर इतका अत्यंत गंभीर चष्म्याचा नंबर अत्याधुनिक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीद्वारे यशस्वीरित्या सुधारण्याची उल्लेखनीय कामगिरीही त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :  डिझेलअभावी पारनेर आगाराची चाके रूतली; लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या रद्द
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ