- जाहिरात -spot_img
breaking news

टेम्पो चोरणारा आरोपी जेरबंद, असा पकडला आरोपी…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
टेम्पो चोरणार्‍या आरोपीस कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. जहीर सादीक शेख (वय १९, रा. नारायणडोह, ता. नगर) असे त्याचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, विशाल दळवी, विजय ठोंबरे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल काजळे, अमोल गाडे, दीपक रोहोकले, सूरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे, अतुल लाटे, याकूब शेख, पल्लवी रोहोकले, राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टेम्पोचा शोध घेत असताना पोलिस सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत होते. आरोपी टेम्पोसह पुणे बसस्थानकासमोर येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पुणे बसस्थानक येथे जाऊन टेम्पोचा पाठलाग करून आरोपीस पकडले. त्याने त्याचे नाव जहीर सादीक शेख असे सांगितले.

हे सुद्धा वाचा :  मोठी बातमी! 'साकळाई'ला मंत्रीमंडळाची मान्यता, विखेंच्या पाठपुराव्याला यश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ