- जाहिरात -spot_img

श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात मुंढे यांचे बॅनर झळकले

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कर्तव्य, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनहितासाठी समर्पित प्रशासनाचा आदर्श ठरलेले महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव करत श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात श्री छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने अभिनंदनाचे भव्य बॅनर झळकविण्यात आले आहेत. या बॅनरची परिसरात मोठी चर्चा होत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले आणि कठोर, पारदर्शक तसेच जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध धडक कारवायांमुळे निकृष्ट व भेसळयुक्त दुध व अन्नपदार्थांवर आळा बसत असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्यवाहीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच जनहिताच्या कार्याला सलाम करत श्री छत्रपती प्रतिष्ठानने फॅक्टरी परिसरात अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. बॅनरवर कर्तव्य, निष्ठा, प्रामाणिकपणा… जनहितासाठी समर्पित नेतृत्व अशा शब्दांत तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. या बॅनरमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.

हे सुद्धा वाचा :  प्रलंबित बिलांवरून ठेकेदार आक्रमक; दिला 'हा' इशारा...
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com