- जाहिरात -spot_img
breaking news

भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ; नरबळीपाठोपाठ रेडाबळी!, नगरमध्ये होणार मोठा भूकंप

लोकसभा निवडणुकीत ११ रेड्यांचा कथीत बळी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आपल्या अश्लील आणि काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्रात बदनाम झालेल्या भोंदू अशोक खरातने पाच नरबळी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली असतानाच याच खरातच्या सांगण्यावरुन लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी ११ रेड्यांचा बळी दिल्याची बाब समोर आली आहे. रेड्यांच्या बळी दिल्या प्रकरणी आता विशेष तपास पथकाच्या जोडीने नगर जिल्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भोंदूगिरीतून काळ्या कारनाम्यांमधून अनेक उच्चभ्रू महिलांच्या जोडीने उच्चभ्रू अधिकारी आणि राजकारण्यांना गंडविणार्‍या अशोक खरात याचे कारनामे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. खरात याने पाच नरबळी दिल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी नाशिक सत्र न्यायालयात केला. यामुळे न्यायालयही स्तब्ध झाले. न्यायाधीश आर. एच. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या न्यायालयीन सुनावणीदरम्यान खरातचे वर्तन लक्ष वेधून घेणारे ठरले.

युक्तिवाद सुरू असताना तो मान खाली घालून उभा राहिला होता आणि स्वतःच्या हाताच्या बोटांकडे एकटक पाहत असल्याचे दिसून आले. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ६७ वर्षीय खरात ३० वर्षांच्या महिलांशी संपर्क साधून त्यांचे शोषण करत होता. तसेच आरोपी महिलांना पेढे खाऊ घालून त्यानंतर पाणी देत असे. ज्यामुळे त्यांना मळमळ होत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, अशोक खरात याचे नगर जिल्ह्यातील राजकीय कनेक्शन समोर आले आहे. त्याचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हीडीओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत नगर जिल्ह्यातून विजय मिळावा यासाठी एका उमेदवाराला ११ रेड्यांचा बळी देण्याचा आणि त्यातून विजय मिळणार असल्याचा दावा त्याने केला होता.

त्यानुसार ज्या उमेदवाला सल्ला देण्यात आला होता, त्या उमेदवाराने ११ रेड्यांचा बळी दिला दिल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यानुसार आरोप- प्रत्यारोपही झाले होते. खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर आणि त्याने नरबळी दिल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी रेडा बळी प्रकरणावर लक्ष केंद्रीत केेले असल्याची माहिती हाती आली आहे. नरबळीचा प्रकार करण्यासह किती रेड्यांचा बळी त्याने दिला अथवा द्यायला भाग पाडले याबाबत पोलिस आता तपास करत असल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव, किती मिळाला पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ