- जाहिरात -spot_img
breaking news

नेवासे फाटा येथे युवकावर कोयत्याने सपासप वार!; काय घडलं पहा

अर्ध्या तासात पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
नेवासा | नगर सह्याद्री
नेवासे फाटा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या पूजा फास्ट समोर शुक्रवार (दि.3) रोजी भर दुपारी एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या चौघा जणांनी एका युवकावर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला चढविला. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून ही घटना नेवासे फाटा येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार व पोलीस पथकाने अर्ध्या तासाच्या आतमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली स्वीप्ट कार आणि कोयते हस्तगत करून दहशत पसरविणाऱ्या आरोपींची घटनास्थळी धिंड काढली.

सविस्तर असे की, नेवासे खुर्द येथे राहणारा जखमी साहिल आसाराम खाजेकर (वय 19 वर्षे) हा त्याची आजी नेवासे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत असल्यामुळे तो आजीला भेटण्यासाठी नेवासे फाटा येथे आला होता. एका स्वीप्ट कारमधून आलेल्या या घटनेतील आरोपी रवींद्र बाळासाहेब शिंदे, रोहित अंकुश बर्डे, सोमनाथ सुरेश चांदणे, संदेश संजय गायकवाड (सर्व राहणार नेवासा बुद्रुक) यांनी जखमी खाजेकर याला मागील भांडणाचा राग धरून तुला आम्ही नेवासा येथे यायला सांगितले नव्हते, तरी तू नेवासा येथे कसा आलास? आज तुझा मर्डरच करतो? अशी धमकी देऊन चौघांनीही खाजेकर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेची माहिती मिळताच नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी तपासाची चक्रेवेगाने फिरवत पोलीस पथकाने पथकाने अवघ्या अर्ध्या तासाच्या आत चारही आरोपीना ताब्यात घेतले. अर्धा तासात या आरोपीना अटक केल्यामुळे नेवासे पोलिसांच्या कार्यतत्परतेवर सर्वसामान्य जनतेने कौतुक केले.

हे सुद्धा वाचा :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरीप पीक विम्याचे ११८.६३ कोटी रुपये मंजूर, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ