- जाहिरात -spot_img
breaking news

बारावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९०.३२ टक्के, कोणत्या तालुक्यात किती पहा

सर्वाधिक ९७.२९ टक्के निकाल लागून जामखेड तालुका अग्रेसर; यंदाही मुलींचीच बाजी  
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल (फ्रेश-प्रथमच परीक्षा देणारे) ९०.३२ टक्के लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९४.५५ टक्के तर मुलांचा निकाल ८६.७४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात जामखेड तालुक्याचा सर्वाधिक ९७.२९ टक्के तर त्या खालोखाल संगमनेर तालुक्याचा निकाल ९५.०१ टक्के लागला आहे.

यंदा बारावी परीक्षेला जिल्ह्यातून ३२ हजार २६३ मुले व २७ हजार ३०२ मुली असे मिळून ५९ हजार ५६५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील प्रत्यक्ष ३१ हजार मुले आणि २६ हजार ९७१ मुली असे मिळून ५८ हजार ८९५ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यातील २७ हजार ६९४ मुले व २५ हजार ५०२ मुले असे मिळून ५३ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांत मुलांचे प्रमाण ८६.७४ टक्के तर मुलींचे प्रमाण ९४.५५ टक्के आहे.

जामखेड तालुक्यातून एक हजार ९१० मुुले व एक हजार २०६ मुली असे मिळून तीन हजार ११६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी प्रत्यक्ष तीन हजार १०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात मुले एक हजार ९०५ व मुली एक हजार १९८ उत्तीर्ण झाल्या. निकालात मुलांचे प्रमाण ९७.८२ टक्के तर मुलींचे प्रमाण ९७.२९ टक्के आहे. जामखेडमध्ये उत्तीर्णाचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांचे जास्त आहे. रेग्युलर, रिपिटर, श्रेणीसुधार योजना आदींतून परीक्षा दिलेले विद्यार्थी मिळून जिल्ह्याचा एकूण ८८ टक्के निकाल लागला आहे.

तालुकानिहाय निकाल
अकोले ८६.७८ टक्के, जामखेड ९७.२९ टक्के, कर्जत ८९.२९ टक्के, कोपरगाव ९०.९६ टक्के, अहिल्यानगर ८९.८६ टक्के, नेवासा ९०.८६ टक्के, पारनेर ९१.९४ टक्के, पाथर्डी ८६.२५ टक्के, राहाता ९१.५९ टक्के, राहुरी ८८.७३ टक्के, संगमनेर ९५.०१ टक्के, शेवगाव ८३.९२ टक्के, श्रीगोंदा ९४.८९ टक्के, श्रीरामपूर ८६.०८ टक्के.

हे सुद्धा वाचा :  उसाला चांगला भाव, वेळेत पेमेंट  : नरेंद्र घुले पाटील
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ