भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने नूतन पदाधिकारी व नगरसेवकांचा सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील बाजारपेठा एकेकाळी देशात नावाजलेल्या होत्या. मात्र आज खूप वेगळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा समस्यामुक्त करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही उपमहापौर धनंजय जाधव यांनी देऊन शहर भाजपाच्या व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उत्तम काम करून व्यापार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात, असे प्रतिपादन उपमहापौर जाधव यांनी केले.
शहर भाजपच्या व्यापारी आघाडीच्या वतीने नूतन उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे यांच्यासह नगरसेवक निखील वारे, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, महेंद्र पडोळे, संजय ढोणे आदींचा आडते बाजारात सत्कार करण्यात आला. तसेच व्यापार्यांच्या विविध मागण्यांचे व प्रलंबित समस्या सोडवण्याचे तसेच जुना दाणे डबरा, गंजबाजर येथील मनपाच्या गाळ्यांची भाडेवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे यांनी दिले. यावेळी निखील वारे म्हणाले, व्यापारी वर्ग कायम भाजपच्या मागे उभा असून भाजप सुद्धा कायम व्यापार्यांना सहकार्य करत आहे. बाजारपेठ्या टिकल्या तरच शहर समृद्ध होईल. यासाठी सत्ताधारी सर्व नगरसेवक प्रयत्नशील राहती. भाजपच्या व्यापारी आघाडीने मांडलेल प्रश्न सोडवण्यासाठीही सहकार्य करतीलच तसेच गाळ्यांची भाडे वाढीचा प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात नीरज राठोड यांनी बाजारपेठ्यांच्या विविध समस्या मांडल्या. हर्शल बोरा यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश लालबागे यांनी आभार मानले. यावेळी व्यापारी आघाडीचे दीपक देहेरेकर, देवेंद्र दुधाले, प्रशांत बुर्हाडे, रुपेश वर्मा, संजय कांगला, लक्ष्मीकांत तिवारी, महेंद्र नांदूरकर, प्रशांत डहाळे, गोपाल वर्मा, किरण रांका, संतोष भटेवडा, धीरज पोखरणा, अरुण पारख, किरण शेटे, प्रवीण सुराणा व राजेंद्र गांधी आदी व्यापारी वर्ग उपस्थित होता.










