मुंबई | नगर सह्याद्री –
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे आपल्या शो मध्ये झालेल्या अश्लील टिप्पणीमुळे चांगला कचाट्यात सापडला आहे. यामुळे प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली. गेल्या 2 दिवसांपासून त्याला धारेवर धरण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही प्रणित मोरेच्या शोविरोधात अॅक्शन घेतली. दरम्यान, या सगळ्या गदारोळानंतर प्रणित मोरेनं अखेर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे.
प्रणित मोरे याच्या शो मध्ये हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार या दोघांनीही अश्लील टिपण्णी केली होती. दोघांच्याही विधानांवर आक्षेप घेण्यात आला. या दोघांचेही व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हिमांशूनं एका तरुणीला डेटवर नेल्याचा किस्सा सांगितला. तर, डॉ. सेजल पवार हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील टिपण्णी केली. या संपूर्ण प्रकरणावर प्रणित मोरेने प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत प्रणितने सगळ्यांची जाहीर माफी मागितली आहे.
ती माझी सगळ्यात मोठी चूक होती
“हॅलो, खरं तर मला हे खूप दिवसांपासून बोलायचं होतं. पण, माझं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं होतं. तुमच्यापैकी अनेकांनी माझा क्राऊड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल. ज्यामुळे मला तिरस्काराचा सामना करावा लागत आहे. मला असं वाटतं की मी यासाठी पात्र आहे. कारण, त्या मुलाने खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या. पण, सगळे हसत होते. त्यामुळे माझ्याकडूनही ते तसंच पुढे नेलं गेलं. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी त्याला तिथेच थांबवायला हवं होतं. जे मी नाही केलं. मी त्याला हे सगळं बोलायला एक प्लॅटफॉर्म दिला. ज्यामुळे या गोष्टी बाहेर आल्या”, असं प्रणित मोरेने व्हिडीओत म्हटलं आहे.
मा सगळ्यांची माफी मागू इच्छितोस मला एक संधी द्या
“मी सगळ्यांची माफी मागू इच्छितो. माझ्याविरोधात जी काही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्याला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. पण, मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की प्लीज मला एक संधी द्या. मी यापेक्षा एक चांगला व्यक्ती बनून दाखवेन. हा माझ्यासाठी एक धडा होता. मी स्वत:वरही काम करत आहे. आणि माझ्या कंटेटवरही काम करत आहे. हे तुम्हाला माझ्या कामात दिसेल”, असं प्रणित मोरेने म्हटलं आहे.










