- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानास प्रारंभ

राहुरी | नगर सह्याद्री

जैवविविधता जपण्यासाठी वृक्ष लागवड गरजेचे आहे. प्रत्येक विदयार्थी व कर्मचाऱ्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. याववर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत-जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी फुले हरित अभियानाची सुरुवात करत आहोत, अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली.

महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र व प्रशिक्षण केंद्रामार्फत पाणलोट क्षेत्र परिसरात फुले हरित अभियानांतर्गत तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वृक्षरोपण करताना डॉ. विलास खर्चे बोलत होते.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. विजयकुमार पाटील, सहायक कुलसचिव वैभव बारटक्के आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात गोंधळ; भाजपच्या शिष्टमंडळाचे पालकमंत्र्यांना साकडे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ