- जाहिरात -spot_img
breaking news

विखेंचा डबल धमाका; शरद पवारांना मोठा धक्का, कर्डीले आमदार, तनपुरे भाजपमध्ये, काय घडलं पहा

आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील
मुंबई / नगर सह्याद्री :
अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील पक्षकार्यालयात पार पडला.

भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधी तब्बल सहामहिन्यांपासून डॉ सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते

याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली आणि त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.

हे सुद्धा वाचा :  युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नीलेश खोडदे

एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार करण्यात यश मिळवताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज रंगली आहे.

शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनुपरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘पक्ष जी जबाबदारी देईल ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन.’, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते. ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्री होते. प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदा आमदार होताच मंत्रिपद मिळाले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. त्यांची राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादीतून प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र आहेत. तर जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे २० वर्षे आमदार होते.

प्राजक्त तनपुरे नेमकं काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला. यावेळी अहिल्यानगरातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनही भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांनी यापुढे पक्षवाढीसाठी काम करणार, असे सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विख पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो. तीन तालुक्यांचा माझा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघाच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. माझा मतदारसंघ ग्रामीण आहे. विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता चालना मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे, असे तनपुरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा :  कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत पपईची पाने आणि बिया, जाणून घ्या त्याचे आयुर्वेदीक फायदे

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ