- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; कोणाची कुठे झाली बदली पहा…

मुंबई / नगर सह्याद्री :
राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बदल्या जाहीर केल्या असून प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आला आहे.

या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (आर्थिक सुधारणा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

पोकरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) प्रकल्प संचालक परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

तसेच, लहु माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माणिक गुरसाळ यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजात नव्या पातळीवर गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  भर उन्हात जरांगे पाटलांचे उपोषण; सरकारकडून मनधरणी, विखे पाटलांंनी सोपविला मसुदा, पुढे काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ