- जाहिरात -spot_img
breaking news

अवकाळीचा पावसाचा नगरमध्ये तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

वादळी पाऊस अन् गारपिटीने टोमॅटो, आंबा बागा उद्ध्वस्त | घरे कोसळल्याने आदिवासी कुटुंबे उघड्यावर
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी, खडकवाडी, कामटवाडी, वारणवाडी आणि वनकुटे या संपूर्ण परिसराला वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले. वादळी पाऊस अन् गारपिटीने टोमॅटो, आंबा बागा उद्धवस्त झाल्या असून, घरे कोसळल्याने आदिवासी कुटुंबे उघड्यावर आली आहे. ५० पेक्षा जास्त विजेचे खांब कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. अवकाळी पावसाने या परिसरात दाणादाण उडवून दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या बागा आहेत. मात्र, वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे बागा संपूर्णपणे जमिनीदोस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. टोमॅटो पाठोपाठ आंब्याच्या फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला असून, झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. कैर्‍यांचा सडा जमिनीवर पडला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे भांडवल वाया गेले आहे.

पळशी येथील गांगड वस्ती आणि काळे वस्ती भागात वादळाने रौद्र रूप धारण केले होते. या भागातील अनेक गरिबांची व आदिवासी बांधवांची घरे कोसळली. काहींच्या घरांचे पत्रे हवेत उडून गेले आहेत. यामध्ये अंकुश चिकणे, महादू जाधव, शिवाजी मधे, गोटीराम मधे, यादव पारधी, सुनील चिकने, कैलास चिकने, बबन चिकने, राजेंद्र चिकने, नारायण चिकने, शुभम कटारे, नितीन जाधव, रबा बरकडे, देवराम बरकडे आणि रामदास मोहिते या आदिवासी शेतकर्‍यांच्या घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राहती घरे पडल्यामुळे अनेक कुटुंबे आणि त्यांची जनावरे उघड्यावर आली आहेत.वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की, पळशी व खडकवाडी परिसरात महावितरणचे ५० पेक्षा जास्त विजेचे खांब कोसळले आहेत. परिणामी, संपूर्ण परिसरातील वीज व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने त्वरित या भागाचे पंचनामे करून बाधित शेतकर्‍यांना आणि बेघर झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड व खडकवाडी येथील प्रगतशील शेतकरी विकास रोकडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :  ग्रामपंचायत सदस्य अशोक पठाडे यांच्यावर हल्ला; निष्पक्ष तपास व कठोर कारवाई करा

पंचनामे करून नुकसानभरपाई द्या
वादळी पाऊस आणि गारपिटीने पळशी व खडकवाडी परिसरातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. टोमॅटो आणि आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक आदिवासी बांधवांची घरे कोसळली आहेत. ५० हून अधिक वीज खांब पडल्याने अंधार पसरला आहे. शासनाने अजिबात वेळ न दवडता या संपूर्ण भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकर्‍यांना तसेच ग्रामस्थांना तात्काळ शासकीय नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा.
-प्रकाश राठोड, सरपंच, पळशी

नवीन विद्युत वाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे
खडकवाडी सबस्टेशनवरून नागापूरवाडीसाठी सुरू असलेले नवीन विद्युत वाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आता उघड झाले आहे. अद्याप केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले असून, पोलवर विजेच्या ताराही ओढलेल्या नाहीत. असे असतानाही केवळ साध्या वादळ-वाऱ्याने हे उभे केलेले पोल जमीनदोस्त झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे महावितरणच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. या पडलेल्या पोलवरूनच महावितरण किती ‘उत्कृष्ट’ काम करत आहे, हे दिसून येते. या संपूर्ण कामाची वरिष्ठ पातळीवरून तात्काळ चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे.
विकास रोकडे, (सामाजिक कार्यकर्ते, खडकवाडी)

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ