- जाहिरात -spot_img
breaking news

अवघ्या 24 तासात पद गेलं…

मुख्यमंत्री विजय यांचा यूटर्न

चेन्नई/वृत्तसंस्था
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांनी त्यांचे ज्योतिषी पंडित रिकी राधा वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) म्हणून नियुक्ती केली होती .मात्र, या नियुक्तीनंतर लगेचच वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या निर्णयावर टीका केली होती. आता या नियुक्तीच्या अवघ्या 24 तासांच्या आत त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

तामिळनाडू सरकारच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या पत्रात पंडित रिकी राधा यांची OSD पदावरील नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री विजय यांनी या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला. CPI(M) आणि CPI या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांनी या निर्णयावर टीका केली होती, त्यानंतर आता मुख्यमंत्री विजय यांनी पंडित रिकी राधा यांना पदावरून हटवले आहे.
CPI(M) चे राज्य सचिव पी. शनमुगम यांनीही या नियुक्तीवर टीका केली होती. वैज्ञानिक विचारसरणी आणि विवेकबुद्धीला प्रोत्साहन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारी खर्चातून एखाद्या ज्योतिषाला सरकारी पद देणे म्हणजे अंधश्रद्धेला चालना देणे होय, असे त्यांनी म्हटले. तर एआयडीएमकेचे खासदार आयएस ईनाबदुरई यांनी सरकारला टोला लगावत म्हटले की, ‘इतरांचे भविष्य सांगणारे पंडित रिकी राधा स्वतःचे भविष्यच पाहू शकले नाहीत. विजय सरकारचे वाईट दिवस सुरू झाले आहेत.’

हे सुद्धा वाचा :  सकाळी रिकाम्यापोटी केळं की खजूर खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर, जाणून घ्या
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ