- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरीचा किंग कोण?, पडद्याआड काय घडतंय…

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी दि. २३ एप्रिलला मतदान होत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला प्रचाराचा धुराळा मंगळवारी सायंकाळी थंडावला. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यातच माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडणुकीपासून दूर असले तरी, महाविकास आघाडीने गोविंद मोकाटे यांच्या रूपाने उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण व पालकमंत्री विखे पाटील यांनी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याशी झालेल्या चर्चेनंतर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. राष्ट्रवादी-शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जाहीर करून महायुतीचे बिनविरोधाचे मनसुबे उधळून लावले. भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी-शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत होत आहे. याशिवाय रावसाहेब खेवरे यांनीही अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीत चुरस वाढविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष शेळके यांनीही शड्डू ठोकले आहे.

सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपवली आहे. विखे- जगताप जोडीने मतदारसंघात दौरे काढून वातावरण तापवले आहे. माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी भाजप प्रवेश टाळला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच आहे, असे सांगत भाजपची धाकधूक वाढविली आहे.

प्रशासन सज्ज
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून २३ एप्रिल २०२६ रोजी होणार्‍या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत ३६ पोलीस अधिकारी, ७०८ पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर ’वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा :  स्व. अरुणकाका जगताप यांचा वाडिया पार्क येथे पूर्णाकृती पुतळा उभारावा, कोणी केली मागणी पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ