- जाहिरात -spot_img
breaking news

भाजीपाला लिलाव केंद्र शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल :  शालिनीताई विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी बुद्रूक येथे सुरू करण्यात आलेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोणी बुद्रूक येथील बाजार तळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या वतीने नव्याने भाजीपाला होलसेल विक्री व्यवस्थेची सुविधा सुरू करण्यात आली. या केंद्राचा औपचारीक शुभारंभ  शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, संचालक राहुल धावणे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोर्डे, प्रभारी सरपंच कल्पना मैड, भाऊसाहेब तुकाराम विखे, दिलीप विखे, प्रविण विखे, एन.डी विखे, बाजार समितीचे सचिव सुभाष मोठे यांच्यासह संचालक आणि शेतकरी उपस्थित होते.राहाता बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सर्वतोपरी सुविधा निर्माण करू दिल्या जात आहेत.

पारदर्शक कारभार, शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे राहाता बाजार समितीला अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अशा होलसेल केंद्राची असलेली गरज बाजार समितीने पूर्ण केल्याबद्दल विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.लोणी येथे सुरू झालेले भाजीपाल्याचे होलसेल केंद्र भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने तसेच जवळील गावांना मध्यवर्ती ठरणार आहे. सकाळी उत्पादित माल होलसेल भावाने विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांना फार लांब जाण्याची वेळ येणार नाही. लोणी बुद्रूक येथील बाजारतळावर मोठे शेड यासाठी उभारण्यात आले असून, मोठा परिसर उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांना सुध्दा होलसेल केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

हे सुद्धा वाचा :  सात कोटी थकबाकी ठेकेदारांकडे; वसुलीच्या नोटिसा मात्र कामगारांना, कामगारांनी काय केले पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ