- जाहिरात -spot_img
breaking news

“तुम तो ठहरे परदेसी’ या लोकप्रिय गीताचे गीतकार कालवश

गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड;
“तुम तो ठहरे परदेसी’ या लोकप्रिय गीताचे गीतकार
नागपूर / नगर सह्याद्री
90 च्या दशकातील सर्वाधिक हिट गाण्यांपैकी ‘तुम तो ठहरे परदेसी,साथ क्या निभाओगे’या गाण्याचे सुप्रसिद्ध गीतकार जहीर आलम यांचे आज निधन झाले. नागपुरात ते वास्तव्यास होते. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाणं 90 च्या दशकात तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. या गीताचे गीतकार जहीर आलम यांच्या निधनाने हिंदी संगीत विश्वातील काळाच्या ओघात दुर्लक्ष झालेला हिरा कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकेकाळी देशभरात सुपरहिट झालेलं हे गाणं सुरुवातीला स्थानिक पातळीवर गायले जात होते. मात्र गायक अल्ताफ राजा यांच्या खास शैलीत हे गाणं सादर झाल्यानंतर रातोरात या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती इतकी की हॉटेल्स, पानपट्ट्या, बस स्थानके, गल्लीबोळात हे गाणं ऐकू येऊ लागलं. एवढेच नाही तर 90 च्या दशकात अनेक कॉलेज, शाळांमधील गॅदरिंगमध्ये सुद्धा तरुण या गाण्यावर थिरकू लागली.
या गाण्यानं अल्ताफ राजा एका रात्रीत सुपरस्टार झाले. या म्युझिक कंपनीचा ही प्रचंड फायदा झाला. मात्र या गाण्याचे बोल लिहिणारे गीतकार जहीर आलम यांच्या वाटायला फारशी प्रसिद्धी, पैसा आला नाही. गीतकार जहीर आलम यांचं सगळं आयुष्य आर्थिक विवंचनेत आणि संघर्षातच गेलं. एम्प्रेस मिलमध्ये ते नोकरीला होते. मात्र, ही मिल नंतर बंद पडली आणि त्यांच्या आयुष्यात आणखी एक कष्टाची पायरी वाढली. जहीर आलम यांच्या निधनाने नागपूरच्या संगीत व सांस्कृतिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे

हे सुद्धा वाचा :  तुम्ही द्राक्षे धुवून खात आहात का? स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ