- जाहिरात -spot_img
breaking news

पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली लोक अडकले, बचावासाठी थेट आर्मी पोहोचली..

पुणे / नगर सह्याद्री :
पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या तातडीच्या सूचना
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या.

दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच जखमींवर तातडीने आणि प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आर्मीकडून बचावकार्याला सुरुवात
समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील लोकांच्या बचावासाठी आता आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. आर्मीचे पथक आता कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवत आहे. इमारतीच्या मागील बाजूस कचरा डेपो असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा इमारतीच्या ढिगाऱ्यावर पसरला असून, जेसीबीच्या साहाय्याने कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

15 जण अडकले
या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा :  धो धो पावसाने मुंबई तुंबली; लोकल विस्कळीत, चार दिवस ऑरेंज अलर्ट; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अडकलेल्या लोकांशी संपर्क होत आहे…
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी सांगितले की, मोशीमध्ये कचरा डेपोची इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक अडकले होते, त्यापैकी पाच जण सुरक्षित बाहेर आले आहेत मात्र अद्यापही 15 लोक आत मध्ये आहेत अडकलेल्या लोकांसोबत आमचा संपर्क होत आहे. लवकरात लवकर त्यांना बाहेर काढणे आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला वेढा घातला आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ