- जाहिरात -spot_img
breaking news

फसव्या कर्जमाफीच्या अध्यादेशाची होळी…राज्य सरकारचा निषेध

राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना  बसणार फटका 

निघोज | नगर सह्याद्री
राज्य सरकारने फसवी कर्जमाफी करीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना झुलविण्याचे काम केले. याचा निषेध करीत शिवबा संघटनेचे अध्यक्ष तसेच पारनेर तालुका युवासेनेचे तालुका प्रमुख अनिल शेटे यांच्यासह सहकाऱ्यांनी कर्जमाफी अध्यादेशाच्या कागदपत्रांची होळी करून फडणवीस सरकारचा निषेध केला आहे.

पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली मात्र यामध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, त्यांना या कर्जमाफी योजनेत टाळण्यात आले आहे. जवळपास राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून याबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली असून, ठिकठिकाणी फडणवीस सरकारचा निषेध होत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने विशेष करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही फसवी कर्जमाफी जाहीर करताना अध्यादेशामध्ये शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. जाचक अटी लागू करून सर्वसामान्य कर्जबाजारी शेतकऱ्यांना माफी मिळणार नाही अशीच तरतूद अध्यादेश जारी करताना त्यामध्ये करण्यात आली आहे. आज शेतकऱ्यांचा विचार केला तर खते, बी, बियाणे यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शेती उत्पादन घ्यायचे असेल तर रोजंदारी मोठ्या प्रमाणात द्यावी लागते. अवेळी पाऊस, हवामान याचा विचार केला तर शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सगळीकडून शेतकरी संकटात सापडला असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करावे, अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना अडविण्याचे काम करून मोठमोठे उद्योजक, उद्योगपती यांना कर्ज सवलत देऊन सरकारची तिजोरी उद्योगपतींसाठी खाली करीत आहे. जनतेवर हा अन्याय असून याचा निषेध म्हणून कागदपत्रांची होळी केली असून फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केल्याची माहिती शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली आहे. यावेळी राजूभाऊ लाळगे, मच्छिंद्र लाळगे, केशव शिंदे, गणेश भुकन, रामा शेटे, संतोष साबळे, संतोष परांडे, शैलेश लामखडे, विशाल लामखडे, लहू बिबळे, रामा सुपेकर, किरण लोंढे, संदीप बाशले, ज्ञानेश्वर हरणे, गौरव मुसळे, रोहित बिबळे, सागर साबळे, दत्तात्रय लंके आदी सहकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  महाराष्ट्राला हादरवणारं कांड, अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश; लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ