- जाहिरात -spot_img
breaking news

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
RCB vs GT, IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने क्रिकेट विश्वात पराक्रम केला आहे. पराक्रमाची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स (जीटी) संघाला पराभूत करत सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, बेंगळुरुने प्रत्येक विभागात प्रभावी कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केलं आणि ५ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह, आरसीबी आयपीएल विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरला. आयपीएल २०२६मध्ये आरसीबीनं धमाकेदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सनं दिलेलं १५६ धावांचे आव्हान आरसीबीने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत पार केलं.

अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी हवी त्याच पद्धतीने फटकेबाजी करत विराट कोहलीनं आपल्या संघाला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिलं. विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी स्फोटक सुरूवात केली. विराट कोहलीने सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने ३० चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आरसीबीने दमदार सुरुवात केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी कर्णधार रजत पाटीदारचा गोलंदाजी घेण्याचा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने कर्णधार शुबमन गिलला अवघ्या १० धावांवर बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. त्यानंतर लगेचच साई सुदर्शन १२ धावांवर बाद झाला. मग जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अष्टपैलू कृणाल पांड्याने अचूक वाईड यॉर्कर टाकून त्याला बाद केलं.

विराट कोहलीची सामना जिंकवून देणारी खेळी
१५६ धावांचे लक्ष्य गाठताना व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने आरसीबीला स्फोटक सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने चार चौकार आणि दोन षटकारांसह १६ चेंडूंमध्ये ३२ धावा ठोकल्या. मात्र देवदत्त पडिक्कल केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर रशीद खानने एकाच षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांना बाद करून गुजरातच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने एक बाजू सांभाळून धरली. यातनंतर टीम डेव्हिडने १७ चेंडूंमध्ये २४ धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान, विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून संघाचा विजय निश्चित केला.

हे सुद्धा वाचा :  मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला मोठा निर्णय;

फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग
आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर टीम हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागल्याची माहिती समोर आलीये. सुदैवाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफ सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने गुजरात टायटन्सचा पराभव केला. दरम्यान सामना संपल्यानंतर गुजरात टायटन्सची टीम बसने हॉटेलकडे निघाली होती. याच दरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ