- जाहिरात -spot_img
breaking news

अवैध माती उत्खननावर महसूलची धडक कारवाई….श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

हिंगणी परिसरात कारवाई
तीन हायवा जप्त; 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील हिंगणी परिसरात सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत तीन हायवा वाहनांसह तब्बल 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ग्राममहसूल अधिकारी आकाश दोरसले यांनी फिर्याद दिली. तहसीलदार सचिन डोंगरे यांना हिंगणी व निंबवी परिसरात अवैध माती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे पथक दि.27 मे रोजी दुपारी कारवाईसाठी रवाना झाले. हिंगणी-गव्हाणवाडी रस्त्यावर महसूल पथकाने संशयित हायवा वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही चालकांनी वाहनांसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल विभागाने पंचनामा करून वाहनांमधील पोयटा माती जप्त केली.या कारवाईत हायवा वाहनांसह अन्य एक वाहन ताब्यात घेण्यात आले. प्रत्येकी सुमारे 20 लाख रुपये किमतीची वाहने तसेच त्यामधील पोयटा माती, असा एकूण 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित वाहन चालकांकडे माती उत्खनन अथवा वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना आढळून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शासनाचा महसूल बुडवणे, विनापरवाना गौणखनिज उत्खनन करणे व पर्यावरणाची हानी करणे आदी आरोपांखाली संबंधितांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  ‘मुळा’वर गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व; १८ संचालक बिनविरोध...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ