- जाहिरात -spot_img
breaking news

युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नीलेश खोडदे

पारनेर | नगर सह्याद्री
उबाठा शिवसेनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी पारनेर येथील युवा उद्योजक निलेश खोडदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते निलेश खोडदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, उद्योजक लहु मुळे, उपतालुकाप्रमुख संदीप मोढवे, सोशल मीडिया गटप्रमुख शुभम पाडळे, माधव मुडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

निलेश खोडदे हे सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय असून युवकांमध्ये त्यांचा व्यापक संपर्क आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला असून, युवकांना संघटित करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

हे सुद्धा वाचा :  अभिषेक कळमकर पुन्हा अडचणीत; भलताच कुटाना समोर, काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ