- जाहिरात -spot_img
breaking news

सुनेत्रा पवार, अक्षय कर्डिलेेंचा ऐतिहासिक विजय! काय आहे अंदाज पहा

बारामती व राहुरी पोटनिवडणूक | ४ मे रोजी मतमोजणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यात बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतदांनी तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवर अक्षय कर्डिले यांचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय होणार असल्याचा एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.

राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०२६ रोजी पोटनिवडणूक झाली. राहुरीमध्ये एकूण ५६.२०% तर बारामतीमध्ये ५८.१७% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले तर बारामती मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या.राहुरीमध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारामतीमध्ये कुठल्याच मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता. रुद्र रिसर्च अँड एनालिटिस या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या मताधियाने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.

सुनेत्रा पवार २ लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार
सर्व्हेनुसार बारामती मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना २१२००० (९५%) तर इतरांना ११७०५ (५%) मते मिळण्याची शयता आहे. सुनेत्रा पवार यांचा २०७००० इतया मोठ्या मताधियाने विजय होण्याची शयता आहे. बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचा असलेला प्रभाव आणि प्रमुख सदस्यांनी मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये असणारी सहानुभूतीची मोठी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, कोणत्याही प्रमुख पक्षाने विरोधात न दिलेला उमेदवार, सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरीक्त असणार्‍या उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा :  आनंदवार्ता! मान्सून सक्रिय; 8 दिवस राज्यात धो-धो पाऊस...

अक्षय कर्डिलेंना मिळणार लाखापेक्षा अधिक मते…
रुद्र रिसर्चच्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना १४२५०० (७६%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २५५०० (१४%) तर इतरांना १९४६३ (१०%) मतदान मिळण्याची शयता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल ११७००० (६२%) इतया मोठ्या मताधियाने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ