- जाहिरात -spot_img
breaking news

किडनी कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; पडू शकते महागात

नगर सह्याद्री वेब टीम –
देशात किडनी कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. किडनीतील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन गाठ (ट्यूमर) तयार झाल्यास किडनी कॅन्सर होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये आढळत असला तरी कोणत्याही वयात, अगदी तरुणांनाही होऊ शकतो. डॉ. सुप्रिया बंबरकर, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, किडनी कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार तसेच काही रसायनांच्या सतत संपर्कात राहणे हे या आजाराचे प्रमुख जोखीम घटक मानले जातात. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा धोका अधिक असून वाढत्या वयानुसार त्याची शक्यता वाढते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
लघवीत रक्त दिसणे (हेमॅच्युरिया) : किडनी कॅन्सरचे हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसू शकतो. एकदाच रक्त दिसले आणि नंतर थांबले तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सतत पाठ किंवा कंबरेच्या एका बाजूला वेदना : दुखापतीशी संबंध नसलेली आणि दीर्घकाळ कायम राहणारी पाठदुखी किंवा कंबरेच्या एका बाजूची वेदना किडनीच्या समस्येचे संकेत असू शकतात.

सतत थकवा जाणवणे : पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. किडनी कॅन्सरमुळे शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होऊन अशक्तपणा येऊ शकतो.

अचानक वजन घटणे किंवा भूक कमी होणे : डाएट न करता अचानक वजन कमी होणे किंवा भूक मंदावणे हीदेखील किडनी कॅन्सरचे लक्षण असू शकते.

याशिवाय कोणतेही संसर्गजन्य आजार नसतानाही ताप येणे, पायांना सूज येणे, अॅनिमिया किंवा पोटात गाठ जाणवणे अशी लक्षणेही काही रुग्णांमध्ये दिसू शकतात.

अनेकदा लोक सुरुवातीची लक्षणं ही किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि वैद्यकीय सल्ला घेण्यास विलंब करतात. त्यामुळे कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरू शकतो आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. किडनी कॅन्सरचे वेळेत निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे, असामान्य लक्षणांची तातडीने दखल घेणे आणि जोखीम घटकांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा :  ओठांचा काळेपणा आणि कोरडेपणा दूर करायचा आहे? घरातील ‘हे’ 5 सोपे उपाय ठरतील उपयुक्त
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ