- जाहिरात -spot_img
breaking news

दिल्लीगेट येथे शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी; बाल शिवाजीचे पाळणा गीत नृत्य, लेझीम डाव व मर्दानी खेळांनी रंगला शिवजन्माचा सोहळा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी नुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त दिल्लीगेट येथे झालेला शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झालेल्या या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यास बाल शिवाजीचा पाळणा गीत नृत्य, महिलांचा लेझीम डाव, लाठीकाठी व तलवार दांडपट्टा या मर्दानी खेळांचे व मल्लखांबचे चित्तथरारक प्रत्यक्षिके तसेच मार्कंडेय शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथक व लेझीमचा डाव अशा नानाविध कार्यक्रमांनी हा शिवजन्मोत्सव सोहळा रंगला.

कार्यक्रमाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या हस्ते अभिवादन करून आरती करण्यात आली. यावेळी ज्येष्ठनेते सुनील रामदासी, ज्येष्ठ विधीज्ञ अच्युतराव पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोपडा यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक नगरसेवक श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम, संजय वल्लाकटी, महेश सब्बन व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी भानुदास कोतकर म्हणाले, दिल्लीगेट येथे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साजरा झालेला हा शिवजयंतीचा सोहळा न भूतो असा भव्यदिव्य झाला आहे. यासाठी छिंदम बंधूंचे अभिनंदन करतो, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

अच्युतराव पिंगळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानने उत्कृष्टपणे शिवजयंती साजरी केले आहे. हजारो नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. असा भव्य सोहळा छिंदम बंधूंनी दरवर्षी साजरा करावा.

प्रास्ताविक नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानचे अमोल बोल्ली, शहीद शेख, रोहन येनगुंदुल, उमेश मेरगू, सागर लोढा, अमृत वन्नम, अक्षय माथेसुळ, संजय आकुबत्तीन, हेमंत गायकवाड, राजू म्याना, राजू जामदारे, विनायक गुडेवार, विजय सामलेटी, नरेंद्र गुरुड, जयंत कारामपुरे, किशोर हरबा, स्वप्निल दिवाने, रोहन येनगुंदुल व सागर बल्लाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  खंडाळा परिसरात भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर, लष्करी जवानाचा जागीच मृत्यू , दोन गंभीर जखमी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ