- जाहिरात -spot_img
breaking news

नफ्याचे आमिष दाखवून शिक्षकाची १ कोटी ३१ लाखांची फसवणूक; काय घडलं पहा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका शिक्षकाची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून तब्बल १ कोटी ३१ लाख ६५ हजार रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरूध्द शनिवारी (२१ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूकृपा हौसिंग सोसायटी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहिल्यानगर येथे राहणार्‍या ५६ वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. ते मार्कंडेय विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात प्राप्त झाली. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमधील अ‍ॅडमिन दीपा रसीमाने हिने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. तिच्या सांगण्यावरून फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच बहिणीच्या बँक खात्यांतून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यात आल्या. २७ नोव्हेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादी यांनी स्वतःच्या खात्यातून सुमारे ७७ लाख ४५ हजार रूपये, मुलाच्या खात्यातून ८ लाख ९० हजार रूपये, मुलीच्या खात्यातून १ लाख ३० हजार रूपये, पत्नीच्या खात्यातून ३० लाख रूपये तसेच बहिणीच्या खात्यातून १४ लाख रूपये अशी एकूण १ कोटी ३१ लाख ६५ हजार रूपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा केली.

दरम्यान, गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची वेळ आल्यानंतर आरोपी महिलेने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. यानंतर संशय आल्याने फिर्यादीने संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (हेल्पलाईन १९३०) तक्रार नोंदवली तसेच येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विविध बँक खात्यांचा वापर करून रक्कम वळवली असल्याची शयता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरूआहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

नफ्याचे आमिष दाखवणार्‍या
जाहिरातींपासून सावध राहा
अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका, अधिक नफ्याचे आमिष दाखवणार्‍या जाहिरातींपासून सावध राहा, कोणतीही रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करा, संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरून बँकेला विकला
अहिल्यानगर: येथील सायबर पोलीस ठाण्यात एका मोठ्या सॉफ्टवेअर चोरीचा प्रकार समोर आला आहे. कंपनीचा गोपनीय सोर्स कोड आणि तांत्रिक माहिती चोरून तिची बनावट प्रतिकृती तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रला विकल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गोपालदास भराडीया यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.या प्रकरणात सॉफ्टमेट सिस्टीम्स एलएलपी कंपनीचे मालक मंदार पाथरीकर आणि शैला केदार यांच्यासह कंपनीचे माजी कर्मचारी मुकुंद दायमा, जालींदर गमे, योगेश चव्हाण आणि चैतन्य दिलीप जोशी यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या कंपनीचा कॉपीराईट असलेला डेटा, युजर इंटरफेस आणि प्रोसेस फ्लो चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माजी कर्मचार्‍यांनी कंपनीतील गोपनीय माहितीचा वापर करून मूळ प्रणालीसारखीच हुबेहूब बनावट प्रणाली विकसित केली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ही प्रणाली बँकेला विकून कंपनीची फसवणूक केली. सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चालक व क्लिनरने केला मालकाचा विश्वासघात
अहिल्यानगर: येथील केडगाव बायपास परिसरात एका मालवाहू ट्रकमधून सुमारे ७८ लाख ८२ हजार १८४ रुपये किमतीच्या कापडाच्या रोलची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एसटीएस ट्रान्सलॉग सोल्युशन कंपनीचे व्यवस्थापक अमरीशकुमार ओमप्रकाश गुप्ता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चालक आणि लिनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथून बेंगलोरला कापडाचे ५५५ रोल घेऊन निघालेला ट्रक (जीजे २७ एक्स ५९३५) अहिल्यानगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे आढळले. कंपनीचा दुसरा चालक सीताराम याने गाडीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून मालकाला माहिती दिली. गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ५५५ पैकी तब्बल ४७० कापडाचे रोल गायब असल्याचे दिसले.या गुन्ह्यात गाडीचा चालक संजय लिलाधर कुमार आणि लिनर लिलु मिना ऊर्फ नंदलाल मिना (दोघेही रा. राजस्थान) यांनी संगनमत करून कंपनीचा विश्वासघात केला आहे.

हे सुद्धा वाचा :   पारनेर पोलीस स्टेशनवर ‌‘जन आक्रोश मोर्चा‌’... काय कारण

ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक
अहिल्यानगर – शहरातील बागडपट्टी परिसरात राहणार्‍या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी संबंधित व्यक्तीने शनिवारी (२१ मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. ८ मे २०२४ रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेघा शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. तिने शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दळवी यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सदर ग्रुपमध्ये ट्रेडिंगविषयक मार्गदर्शन दिले जात असल्याने दळवी यांनी सुरूवातीला लहान रकमेची गुंतवणूक केली. अ‍ॅपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ