- जाहिरात -spot_img
breaking news

खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. खासदार सोनवणे यांच्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बजरंग सोनवणे यांच्या कारचे नुकसान झाले. त्यांच्या कारच्या काचा फुटल्या. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्यावेळी ही अपघाताची घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर जमाव जमला होता. या अपघातात बजरंग सोनवणे यांना काही झाले नाही पण त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा :  भारताला मोठा दिलासा! मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पहा काय घडलं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ