- जाहिरात -spot_img

कडूस-भोयरे गांगर्डा-वाळवणे रस्त्यावर खड्डेच खड्डे

 ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला तिलांजली

सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कडूस- भोयरे गांगर्डा- रूईछत्रपती- वाळवणे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कडेला साईडपट्ट्यालगत झाडाझुडुपांचा विळखा तयार झाला असून, रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी साईडपट्या पूर्ण खचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे रस्ता देखभाल दुरुस्तीची मुदत डिसेंबर 2022 रोजी संपली असल्याने ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला तिलांजली दिली जात आहे. बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच कडूस- भोयरे गांगर्डा- रुईछत्रपती ते वाळवणे या 11 किमी रस्त्याचे काम जानेवारी 2018 यावष पूर्ण झाले होते. मात्र, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने यावर खाच खळगे, चढ उतार मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते.कडूस-भोयरे गांगर्डा-रुईछत्रपती-वाळवणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता काही समजत नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 15 ते 20 गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहराकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून विद्याथ, दुध उत्पादक, कंपनी कामगारांची तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, अहिल्यानगर, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते.

ग्रामस्थ घालणार आमदार दातेंना साकडं
कडूस- भोयरे गांगर्डा- रूईछत्रपती- वाळवणे रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून मुदत संपल्याने रस्ता देखभाल दुरूस्तीकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. याबाबत भोयरे गांगर्डा ग्रामस्थ लवकरच आमदार काशिनाथ दाते यांची भेट घेऊन रस्त्यासाठी साकडं घालणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  रंगांत रंगले बालगोपाळ...; शहरात धूलिवंदनाचा उत्साह
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com