- जाहिरात -spot_img
breaking news

सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या! किती आहे आजचा बाजारभाव…

मुंबई / नगर सह्याद्री :
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र 12 मार्च रोजी या वाढीला ब्रेक लागला असून बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. डॉलर मजबूत झाल्यावर गुंतवणूकदार अनेकदा सोन्यातील गुंतवणूक कमी करतात, त्यामुळे सोन्याचे दर खाली येतात. तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचाही बाजारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतातील सराफा बाजारावरही झाला असून अनेक शहरांमध्ये सोने-चांदीचे दर कालच्या तुलनेत कमी झाले आहेत.

आजचे सोन्याचे दर
सध्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹1,62,370 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल हा दर सुमारे ₹1,63,460 प्रति 10 ग्रॅम होता.
22 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹1,48,850 प्रति 10 ग्रॅम आहे, तर काल तो ₹1,49,850 प्रति 10 ग्रॅम होता.
याशिवाय 18 कॅरेट सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,21,820 प्रति 10 ग्रॅम आहे. काल हा दर ₹1,22,630 प्रति 10 ग्रॅम होता.

मोठ्या शहरांमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई – 24 कॅरेट: ₹1,62,220 | 22 कॅरेट: ₹1,48,700
जयपूर – 24 कॅरेट: ₹1,62,370 | 22 कॅरेट: ₹1,48,850
लखनऊ – 24 कॅरेट: ₹1,62,370 | 22 कॅरेट: ₹1,48,850
दिल्ली – 24 कॅरेट: ₹1,62,370 | 22 कॅरेट: ₹1,48,850
कोलकत्ता – 24 कॅरेट: ₹1,62,220 | 22 कॅरेट: ₹1,48,700
सोन्याच्या दरातील ही घसरण अल्पकालीन असू शकते, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती यावर पुढील दर अवलंबून असतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक मानले जात आहे.

हे सुद्धा वाचा :  मार्च हिटने महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याकडून काय दिलाय अलर्ट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ