- जाहिरात -spot_img
breaking news

36 तासांच्या थरारक तपासानंतर अपहृत मुलगी ताब्यात, चंदुकाका सराफ मधून मिनी गंठण चोरीला, तरुणावर हल्ला, कुठे काय घडलं

 

अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी 36 तासांच्या थरारक तपासानंतर ताब्यात
कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घण्यात पोलिसांना यश आले आहे. ‌‘ऑपरेशन मुस्कान‌’ अंतर्गत कोतवाली पोलिसांनी सलग 36 तास थरारक तपास करत मुलीची सुटका केली आणि संशयित आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास एका 17 वषय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप उर्फ व्हन्या परशुराम इजगत (रा. रेल्वे स्टेशन बोहरी चाळ, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध पीडितेच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आणि मुलगी बेपत्ता होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी हा मुलीसह पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी तातडीने तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद आणि अमोल गाडे यांचे विशेष पथक तयार करून पुण्यात रवाना केले.

पुण्यात पोहोचलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तांत्रिक विलेषणाचा आधार घेतला. सलग 36 तास पाळत ठेवून पोलिसांनी अखेर आरोपी प्रदीप इजगत याला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अहिल्यानगर येथे आणून गुन्ह्यात रीतसर अटक केली आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, श्वेता परमासागर, याकूब सय्यद, अमोल गाडे, राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.

चंदुकाका सराफ शोरूममधून मिनी गंठण चोरले,
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी येथील प्रसिद्ध चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड शोरूममधून तीन अनोळखी महिला आणि एका पुरुषाने ग्राहकाचा बहाणा करून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावेडी शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुहास बाहुबली भोसेकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  पहिल्याच पावसात कृष्णाई इन्फ्रा कंपनीचे पितळ उघडे ... श्रीगोंदा-मांडवगण रस्ता पाण्यात

त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी महिला आणि एका पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावेडीत अपेक्स रुग्णालयाशेजारी चंदुकाका सराफ यांचे शोरूम आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शोरूममध्ये तीन महिला आणि एक पुरुष ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने काउंटरवरील कर्मचाऱ्याला सोन्याचे पट्टीचे शॉर्ट गंठण दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने काही दागिने दाखवले, मात्र ते पसंत नसल्याचे सांगून ते सर्वजण खरेदी न करताच शोरूममधून निघून गेले. त्यानंतर काउंटरवरील दागिन्यांची मोजदाद केली असता, त्यामध्ये एक सोन्याचे मिनी गंठण कमी असल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.संशय आल्याने शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले. त्यामध्ये आकाशी रंगाची साडी नेसलेल्या एका महिलेने काउंटरवरील सोन्याचे मिनी गंठण अत्यंत हुशारीने उचलून स्वतःच्या साडीत लपवल्याचे स्पष्ट दिसले. चोरट्यांनी 16 ग्रॅम वजनाचे आणि 2 लाख रुपये किमतीचे हॉलमार्क असलेले सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी परशुराम करत आहेत.

जिल्हा प्रशिक्षण केंद्रात चोरी; साहित्य लंपास
अहिल्यानगर: शहरातील सिव्हील हॉस्पिटल आवारात असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात अज्ञात चोरट्यांनी खिडकीची भिंत तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयातील मौल्यवान इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्य असा एकूण 25,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री संभा शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी कर्मचारी योगेंद्र पालवे कार्यालयात आले असता, त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे आणि वातानुकूलित यंत्र (एसी) सुरू असल्याचे आढळले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ डॉ. शिंदे यांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने आत प्रवेश केला असता, कार्यालयातील कपाटे उघडी आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी मागील खिडकीची भिंत तोडून आणि लोखंडी गज मोकळे करून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी कार्यालयातून 1 ॲम्प्लीफायर, 2 प्रोजेक्टर, 3 कॉम्प्युटर साऊंड सिस्टीम, 3 गिझर, 1 डीव्हीडी प्लेअर, 2 माईक स्टँड, व्हिडिओ कॅमेरा, फोटो कॅमेरा आणि 60 फूट केबल वायर चोरून नेली आहे.

हे सुद्धा वाचा :  15 जुलैला संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

तरुणावर प्राणघातक हल्ला
अहिल्यानगर: चांदणी चौक ते स्टेट बँक चौकाकडे पायी जात असलेल्या एका तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस सतराम दराडे (वय 20, रा. पागुरी पिंपळगाव, ता. पाथड) हा तरुण रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चांदणी चौकातून पायी जात होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आकाश पवार, सोमनाथ गुंजाळ, आदेश थोरात आणि अभि (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. एकविरा चौक, अहिल्यानगर) हे त्या ठिकाणी लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी तेजसला अडवून शिवीगाळ केली.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ