- जाहिरात -spot_img
breaking news

अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीचा छापा, भिंगार केडगावमध्ये बंद घर फोडले, वृद्धेचे दागिने लंपास…

बोलेरोसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहरात अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत बोलेरो वाहनासह तब्बल ८ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत होते. दिनांक १४ मे रोजी जामखेड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना एका गुप्त बातमीदारामार्फत बोलेरो (एमएच १६ डीएम ९२४४) वाहनातून देशी व विदेशी दारूची  वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने जामखेड शहरातील मारुती मंदिराजवळ खर्डा रोड परिसरात सापळा रचला.

दरम्यान, संशयित बोलेरो वाहन येताच पोलिसांनी वाहन थांबवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शरद बाबासाहेब शिकारे (वय ३७, रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण, ता. जामखेड) असे सांगितले.तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून ६३ हजार रुपयांची देशी-विदेशी दारू आणि ७ लाख ५० हजार रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण ८ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

भिंगारमध्ये बंद घर फोडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील भिंगार परिसरात असलेल्या श्रीराम कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे ६ लाख ६० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील पितांबर पाठक हे श्रीराम कॉलनीतील राहते घर बंद करून बाहेर गेले होते. १२ मे ते १४ मे या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून ५६ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ६० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याची गोफ, माळ, अंगठ्या, कानातले कर्णफुले आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे.

या प्रकरणी सुनील पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केडगाव परिसरात भरदिवसा घरफोडी
अहिल्यानगर: शहरातील केडगाव परिसरातील इंडस्ट्रियल एरियात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समर्थ नगर येथील साईलिला निवासस्थानात राहणारे फिर्यादी राजू सोन्याबापू गहीले हे दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची संधी साधली. अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील हॉलमध्ये असलेल्या टीव्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अडीच हजार रुपये किमतीच्या चांदीच्या रिंगा आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा :  आरटीआय कायद्यातील बदल मागे घ्या, अन्यथा.. : अण्णा हजारे यांनी काय दिला इशारा पहा

रिक्षा प्रवासात वृद्धेचे दागिने लंपास
अहिल्यानगर: शहरातील तारकपूर बसस्थानक ते मुकुंदनगर दरम्यान रिक्षाने प्रवास करणार्‍या एका वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी महिला पतीसोबत श्रीरामपूर येथून अहिल्यानगरला एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आल्या होत्या. तारकपूर बसस्थानकावर उतरल्यानंतर त्या एका रिक्षामध्ये बसल्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या जवळील ३० हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गळ्यात घातले होते. रिक्षाचालकाने त्यांना मुकुंदनगर गेटवर सोडले. तेथून दुसर्‍या रिक्षानी त्या लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचल्या. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना गळ्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही दागिने मिळून आले नाहीत. महिलेने पोलिसांत धाव घेतली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ