- जाहिरात -spot_img
breaking news

प्रेम आंधळं असतं: महिला जेलरने कैद्याशी केलं लग्न; प्रकरण काय पहा..

मुंबई / नगर सह्याद्री
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचा प्रत्यय देणारी एक अनोखी घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिला जेलरने चक्क तुरुंगातील कैद्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह केला आहे. समाज आणि धर्माच्या भिंती ओलांडून झालेला हा विवाह सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सतना येथील मध्यवर्ती कारागृहात फिरोजा खातून या जेलर म्हणून कार्यरत होत्या. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह नावाचा तरुण एका प्रकरणात शिक्षा भोगत होता. ड्यूटीदरम्यान फिरोजा आणि धर्मेंद्र यांची ओळख झाली. सुरुवातील झालेली ही ओळख मैत्रीत बदलली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झाले. धर्मेंद्र सिंह याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. फिरोजा खातून या मुस्लिम समुदायातील आहेत, तर धर्मेंद्र सिंह हा हिंदू आहे. या विवाहासाठी फिरोजा यांच्या कुटुंबियांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र आपल्या प्रेमावर ठाम राहून फिरोजा यांनी धर्माच्या सीमा ओलांडून धर्मेंद्रसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

बजरंग दलाने केलं कन्यादान
या विवाहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, फिरोजा यांनी हिंदू रितीरिवाजानुसार धर्मेंद्रशी लग्न केले. यावेळी फिरोजा यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. अशा वेळी हिंदू संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत फिरोजा यांच्या कन्यादानाची जबाबदारी पार पाडली. पूर्ण धार्मिक विधींनुसार हा विवाह सोहळा पार पडला. सध्या या दांपत्याचे फोटो आणि ही अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ‘प्रेमाला कोणतेही बंधन नसते’ अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे

हे सुद्धा वाचा :  धो धो पावसाने मुंबई तुंबली; लोकल विस्कळीत, चार दिवस ऑरेंज अलर्ट; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ