- जाहिरात -spot_img
breaking news

सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भक आढळले, पोलीस आरोपीच्या शोधात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर परिसरातील आनंद नगर येथील सीना नदीच्या पात्रात एका अज्ञात नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर येथील विक्रांत जिमच्या मागील बाजूस असलेल्या सीना नदीच्या पात्रातील सिमेंटच्या नाल्यात एक अर्भक तरंगत असल्याची माहिती नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अंदाजे आठ दिवस वयाचे पुरुष जातीचे अर्भक पालथ्या अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसून आले. या अर्भकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दल आणि न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले. नायब तहसीलदार गणेश भानवसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला.

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या अपत्य जन्माची माहिती लपवण्याच्या उद्देशाने या अर्भकाचा मृतदेह नदीत फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिलीप गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघ हे करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा :  मायडियाचे एसी लांबविणाऱ्यांना बेड्या; हैदराबादऐवजी गुलबर्ग्यात वळवला कंटेनर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ