- जाहिरात -spot_img
breaking news

‘संदीप उद्योग समूह’ची जागतिक स्तरावर वेगळी ओळख ; सिने अभिनेता सोनू सूद

 नगर-पुणे रोडवरील ‘हॉटेल सचिन’चा दिमाखदार शुभारंभ
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एखाद्या शहराची प्रगती व ओळख ही त्या शहरातील उद्योग-व्यवसायावर अवलंबून असते. उत्कृष्ट हॉटेल्समुळे व्यवसायाला चालना मिळते. संदीप उद्योग समूहाने ग्राहकांचा विश्वास संपादन करत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अहिल्यानगरचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. येथे चित्रीकरणास मोठा वाव आहे. संदीप उद्योग समूहाने हॉटेल सचिनच्या माध्यमातून सेलिब्रेटींना राहण्याची उत्तम सोय केली आहे. त्यामुळे येथे चित्रीकरणास हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेता सोनू सूद यांनी केले.

अहिल्यानगर-पुणे रोडवरील चास परिसरात संदीप उद्योग समूहाच्या ‘हॉटेल सचिन’ च्या शानदार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संभाजीनगरचे खासदार तथा माजी मंत्री संदिपान भुमरे, आमदार अण्णासाहेब माने, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, धनश्री सुजयदादा विखे, संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, उद्योजक चंद्रकांत गाडे, बाळासाहेब केरुनाथ विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र चोपडा, विनायक देशमुख, अनुराधा नागवडे यांच्यासह संदीप उद्योग समूहाचे सुरेखा कोतकर, भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर, सुवर्णाताई जगताप आदींसह मोठ्या संख्येने अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

अभिनेते सोनू सूद म्हणाले, मोठी स्वप्ने पाहून शून्यातून सुरुवात केल्यास उंच शिखर गाठता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संदीप उद्योग समूह आहे. कोणत्याही अडचणींत न खचता पुढे जाण्याची वृत्तीच यश मिळवून देते, असे म्हटले. हॉटेल सचिनचे माझ्या हस्ते शुभारंभ होत आहे त्या माध्यमातून या कुटुंबाचा हिस्सा बनलो आहे. त्याचा मला गर्व आहे. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर संदीप उद्योग समूहाची वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, संदीप उद्योग समूहाचे नाव आता महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण देशभर पोहोचले आहे. वाढत्या ग्राहकसंख्येचा विचार करता संभाजीनगरमध्येही समूहाने विस्तार करावा. प्रास्ताविकात आदित्यनराजे कोतकर यांनी संदीप उद्योग समूहाची यशस्वीरित्या झालेल्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली.

हे सुद्धा वाचा :  खत विक्रेते व कृषी अधिकारी समोरासमोर; सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने सुटला पेच

यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार आण्णासाहेब माने व धनश्री विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्तकरत समूहाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उदयनराजे कोतकर व विश्वयनराजे कोतकर यांनी आभार मानले. उत्कर्षा बोरा यांनी सूत्रसंचालन केले.

आम्ही संकटांना घाबरत नाही ः माजी महापौर संदीप कोतकर
व्यवसायात लगेच मालक होऊन चालत नाही, अगोदर कामगार व्हाव लागतं. छोट्या छोट्या गोष्टींचे बारकावे आम्हाला वडिलांनी शिकवले. प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची शिकवण आम्हाला दिलीय. आम्हाला व्यवसायात अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आम्ही संकटांना घाबरत नाही. खोटं करत असताना, किती खोटं करायच, याला काही मर्यादा असते. आम्ही घाबरत नाही. आमची नीतिमत्ता साफ असल्याचे माजी महापौर संदीप कोतकर यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

आईवडिलांच्या संस्कारांमुळेच आम्ही यश मिळवू शकलो
कोतकर परिवाराने हॉटेल व्यवसायात मानाचा तुरा रोवला आहे. हॉटेल सचिन रोल मॉडेल ठरेल. १९८१ मध्ये लोकसेवाच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात पर्दापण केले. फेब्रुवारीमध्ये १९८७ मध्ये हॉटेल संदीप, १९९९ मध्ये हॉटेल न्यू सचिन प्युअर व्हेज, जून २०१० मध्ये हॉटेल उदयनराजे पॅलेस, २०२० मध्ये हॉटेल संदीप (शिवाजीनगर), २०२२ मध्ये हॉटेल संदीप (मगरपट्टा), हॉटेल संदीप चंदननगर, २०२४ मध्ये हॉटेल संदीप (पुनावळे), २०२६ मध्ये हॉटेल सचिन प्युअर व्हेज नव्याने सुरू होत आहे. संदीप प्राईड मॉल अ‍ॅड बिझनेस सेंटरही अहिल्यानगरवासीयांच्या सेवेत लवकरच येणार आहे. संदीप उद्योग समूहाचे संस्थापक भानुदास कोतकर यांनी लावलेले रोपटे आत वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. सदीप उद्योग समूह उद्योगासोबत सामाजिक, कृषी व इतर क्षेत्रांतही समूह कार्यरत आहे. आई वडिल आणि स्वादप्रेमी यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आईवडिलांच्या संस्कारांमुळेच आम्ही यश मिळवू शकलो असे मत माजी महापौर संदीप कोतकर यांनी यावेळी मांडले. दरम्यान, मार्गदर्शक स्व. आमदार अरुणकाका जगताप व शिवाजीराव कर्डिले यांच्या योगदानाची आठवण करून दिली.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या 'त्या' निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध, दिला 'हा' इशारा

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ