- जाहिरात -spot_img
breaking news

सुगंधित तंबाखूसह कार जप्त; आरोपी फरार

2 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ; आरोपी फरार

शेवगाव | नगर सह्याद्री
वरूर ते शेवगाव रोडवर मारुती सुझुकी कारमधून बेकायदेशीररित्या सुगंधित तंबाखू आणि तयार मावा वाहतूक करणाऱ्या वाहनावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुगंधित तंबाखू, मावा आणि कारसह एकूण 2 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलिसांना पाहून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. वरूर ते शेवगाव रोडने एका मारुती सुझुकी कारमधून बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि तयार मावा विक्रीसाठी नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास पथक रवाना केले. पोलिसांना पाहून आरोपी पळाला.

वरूर ते शेवगाव रोडवर पोलिसांनी खासगी वाहनांसह सापळा रचला. संशयित कार येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच कारचालक जावेद राजु शेख (रा. शेवगाव) हा गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि मावा आढळून आला.
या कारवाईत सुगंधित तंबाखू मोठी पाकिटे, लहान पाकिट, तयार मावा, मारुती 800 कार असा एकूण 2 लाख 20, हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी जावेद राजु शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक बाजीराव सानप, रामहरी खेडकर तसेच पोलीस कर्मचारी आदिनाथ खेडकर, शाम गुंजाळ, भगवान सानप, एकनाथ गर्जे, राहुल खेडकर, नकुल फलके, रोहित पालवे, वसंत वैद्य, प्रशांत आंधळे, ईश्वर बेरड, राजु बडे आणि संपत खेडकर यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  मार्च महिन्यातच लिंबू शंभरी पार...; युद्धाचा काय झाला परिणाम पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ