- जाहिरात -spot_img
breaking news

सावळीविहीर खुर्दच्या विकासकामांचा डॉ. विखेंकडून आढावा; काय दिल्या सूचना पहा..

लोणी | नगर सह्याद्री
सावळी विहीर खुर्द येथे सुरू असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासकामांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीपासून ते एमआयडीसी परिसरातील रस्ते, गटार, पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशन, बांधकाम सुरू असलेल्या आयटीआय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी तसेच अन्य मूलभूत सुविधांपर्यंत प्रत्येक कामाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार आणि ग्रामस्थांसमवेत विकासकामांबाबत विस्तृत चर्चा करत कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सावळीविहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली. पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, पशुसंवर्धन क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे काम, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच इतर पूरक बांधकामांची प्रगती त्यांनी प्रत्यक्ष पाहून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार साहित्याचा वापर झाला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. प्रत्येक काम तांत्रिक निकषांनुसार आणि नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. पाहणीदरम्यान काही ठिकाणी आवश्यक सुधारणा सुचवत त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी संबंधित असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक बाब उच्च दर्जाची असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या आयटीआय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आधुनिक तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असून, या आयटीआय महाविद्यालयामुळे परिसरातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळून उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेत गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.

हे सुद्धा वाचा :  खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना सहकार्य... एपीआय गितेंना सहआरोपी करा

डॉ. विखे पाटील यांनी ग्रामस्थ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सावळीविहीर खुर्द एमआयडीसी परिसराची सविस्तर पाहणी केली. औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सांडपाणी निचरा, स्वच्छता, अतिक्रमण, वीज, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या तसेच गटार व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आल्या. ग्रामस्थांनी विविध अडचणी मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ठेकेदार, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ