- जाहिरात -spot_img
breaking news

अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया,आशा फिरोदिया अनुष्का फिरोदिया ,गौरव भंडारी ,काव्या फिरोदिया यांच्या हस्ते महापुजा करुन आरती करण्यात आली.

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे, प्रा माणिकराव विधाते, नितीन पुंड गणेश राऊत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पंडितराव खरपुडे म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला. या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाली. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सात त्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते.

असेच अक्षयतृतीयानिमित्त आंबा स्वरुपात भाविकांनी दान दिले असल्याचे सांगून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. माणिकराव विधाते यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दानशूर भाविकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोकराव कानडे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर रासकर यांनी मानले यावेळी विजय कोथिंबिरे म्हणाले कि यासाठी फिरोदिया परिवार आणि गणेश भक्त यांचे सहकार्य लाभले. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये 41 लाखांची फसवणूक, असा आला उघडकीस प्रकार...जेऊरमध्ये राडा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ