मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो. ती तिच्या प्रत्येक लुकमध्ये काहीतरी वेगळं आणि हटके करून चाहत्यांना प्रभावित करते. यावेळीही तिने ‘स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’मध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळ्या लुक्समध्ये एन्ट्री घेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या अवॉर्ड सोहळ्यासाठी आलियाने पहिल्यांदाच होस्टिंग केली. रेड कार्पेटवर तिचा देसी लुक सर्वांना भावला, तर स्टेजवर तिने बॉस लेडी अवतारात एंट्री घेतली. दोन्ही लुक्समध्ये ती कमाल दिसली, पण तिच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या साडीने खास लक्ष वेधलं.
या खास प्रसंगी आलियाने डिझायनर गौरव गुप्ता यांची कस्टम डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. सिल्क सॅटन फॅब्रिकची ही साडी बॉडी-हगिंग सिल्हूटमध्ये तयार करण्यात आली होती, ज्यामुळे तिचा लुक एलिगंट आणि क्लासी दिसत होता. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर लावलेले मोगऱ्याचे फुलांचे टॅसल्स. या फुलांनी साडीला ट्रेडिशनल आणि मॉडर्न अशा दोन्ही स्टाइलचा सुंदर संगम दिला. साडीच्या पल्लूला लांब ट्रेल स्टाइल देण्यात आला होता आणि मोगऱ्याच्या फुलांना बॉर्डरप्रमाणे सजवण्यात आलं होतं.

काही फुलं शरीराभोवती गुंडाळून खांद्यावर अटॅच केली होती, ज्यामुळे संपूर्ण लुकला ड्रामॅटिक टच मिळाला. हा लुक साधा असूनही खूप आकर्षक वाटत होता. या साडीबरोबर आलियाने पर्ल डिटेलिंग असलेला ब्लाउज परिधान केला होता. डीप वी नेकलाइन आणि स्लीव्हलेस डिझाइनमुळे तिच्या लुकमध्ये ग्लॅमरची भर पडली. पर्ल्सची बारीक नक्षी या लुकला अधिक रिच आणि डेलिकेट बनवत होती. स्टाइलिंगबाबत बोलायचं झालं तर आलियाने ज्वेलरी खूपच मिनिमल ठेवली. तिने स्टेटमेंट चोकर, स्टड इअररिंग्स आणि रिंग्स घातल्या होत्या. सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाइल आणि न्यूड मेकअपने तिचा संपूर्ण लुक अधिक नैसर्गिक आणि आकर्षक बनवला. यामुळे साडीची डिटेलिंग अधिक उठून दिसली.

देसी लुकनंतर आलियाने स्टेजवर ब्लॅक थ्री-पीस टक्सीडोमध्ये एंट्री घेतली. या लुकमध्ये ती एकदम बॉस लेडीसारखी दिसत होती. फ्लेअर्ड पँट्स, फिटेड ब्लेझर, वेस्ट आणि व्हाइट शर्ट यांचा क्लासिक कॉम्बिनेशन तिच्यावर खूपच उठून दिसत होता. ब्लॅक टायने तिच्या लुकला परफेक्ट फिनिश दिला. या लुकमध्येही तिने ज्वेलरी साधी ठेवली होती. डायमंड स्टड्स, रिंग्स आणि टायमध्ये ब्रोच अशा छोट्या डिटेल्समुळे तिचा लुक अधिक स्टायलिश झाला. केस मिडल पार्टिंग करून ओपन ठेवले होते, ज्यामुळे तिचा आत्मविश्वासपूर्ण अंदाज अधिक ठळक झाला.










