- जाहिरात -spot_img
breaking news

रोहित पवारांचा सरकारला इशारा; …तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, काय म्हणाले पहा…

पंढरपूर / नगर सह्याद्री :
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे. त्यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका रोहित पवारांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना जाहीर केली.

“आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही,” असं विधान रोहित पवारांनी यावेळी बोलताना केले आहे.

आंदोलनादरम्यान पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी मध्यस्थी करत रोहित पवार यांची राज्याचे कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली. या चर्चेत 2019 च्या कर्जमाफीवरील अटी हटवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, सरकारने ही भूमिका अधिकृतपणे माध्यमांसमोर जाहीर केल्याशिवाय आंदोलन स्थगित करण्याचा विचारही करणार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचेही माहिती समोर आली आहे. तरीही, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आंदोलनाची माहिती राज्यभर पोहोचल्यानंतर विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मनोज जरांगे यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांतील काही नेतेही आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता माघार घेणार नाही : रोहित पवार
अन्नत्याग आंदोलनामुळे कुटुंबीय भावूक झाल्याचे सांगताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “वडील कालपासून आंदोलनस्थळी आहेत. पत्नी आणि मुलंही काळजी व्यक्त करत आहेत. मुलं लवकर घरी परतण्याचा आग्रह करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता माघार घेणार नाही.” तसेच त्यांनी यावेळी बोलताना “शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता येतात, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अटी का लादल्या जातात?” असा सवाल सरकारला केला आहे. कर्जमाफीतील सर्व अटी हटवून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारकडून रोहित पवारांच्या मागण्यासंदर्भात काय चर्चा होते आणि यावर काही तोडगा निघणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

हे सुद्धा वाचा :  १७ राज्यांत पाऊस धुमाकूळ घालणार; वादळी वारे अन् ढगफुटीचा अंदाज, IMD चा अलर्ट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ