- जाहिरात -spot_img
breaking news

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला मिळाले नवे कारभारी; अध्यक्षपदी सरस्वती घुले, उपाध्यक्षपदी कराड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी संगमनेर येथील सरस्वती घुले तर उपाध्यक्षपदी पाथड येथील शिवाजी कराड यांची  निवड करण्यात आली. या निवडीनंतर बँकेच्या आवारात एकच जल्लोष करण्यात आला.

गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बँकेवर सत्ता आहे. यापूव अध्यक्षपदी गोरक्ष विटनोर व उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिरसाठ यांची निवड करण्यात आली होती. सर्वांना संधी देण्यासाठी या दोघांनी आपला कार्यकाल पूर्ण करून राजीनामे दिले होते. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. आपलीच वण लावावी, यासाठी संचालकाकडून जोरदार लॉबिंग करण्यात आले होते. शिक्षक बँकेचे नेते तांबे यांनी सर्वांची मते जाणून घेत नाव गुलदस्त्यात ठेवले होते.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी दि.20 रोजी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रकिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी सरस्वती घुले व उपाध्यक्ष पदासाठी शिवाजी कराड यांची  निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सत्कार केल्ाा. त्यानंतर शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्याहस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संतोष दुसुंगे, दत्ता पाटील कुलट, विद्युलता आढाव, गोकुळ कळमकर, संघाचे अध्यक्ष बबन गाडेकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित हाते. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. फटाके वाजवत, गुलाल उधळून सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :  टूर अँड ट्रॅव्हल्सच्या चालकाकडून भाविकांची फसवणूक, तरुणाला १२ लाखांना फसवले, चालकाला लुटले...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ