- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर शहरातील महामार्गाचे काम संथ गतीने…कारण काय

नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातून जात असलेल्या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाला गती देऊन पुढील दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करावे, अशी मागणी पारनेर तालुका रिपब्लिकन पाट ऑफ इंडियाचे (आरपीआय) युवक तालुकाध्यक्ष प्रदीप नगरे यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात प्रदीप नगरे यांनी पारनेर शहरातील वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय, सुपा रोड आणि पानोली चौक या दरम्यानच्यामहामार्गाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पारनेर बसस्थानकापासून शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची याच मार्गावरून नेहमी वर्दळ असते. शाळा-कॉलेज भरताना आणि सुटताना या परिसरात प्रचंड गद होत असते. जर शाळा सुरू असताना हे काम रेंगाळत राहिले, तर या भागात वाहतूक कोंडी होऊन अपघातांची मोठी शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ कमी आहे. हीच योग्य वेळ साधून ग्रामीण रुग्णालय, सुपा रोड आणि पानोली चौक या भागातील रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर गती द्यावी. पुढील दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते आदेश पारित करावेत, अशी आग्रही मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना
देवीभोयरे फाटा, पारनेर, हंगा, सुपा, वाळवणे, खडकी या रस्त्याचे काम हुडकोच्या आर्थिक सहाय्यातून सध्या प्रगतीपथावर आहे. याच कामाचा भाग असलेल्या पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय, सुपा रोड आणि पानोली चौक या परिसरातील कामाला लवकरात लवकर गती देऊन ते पूर्ण करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  गद्दारांनी आधी राजीनामे द्यावेत, मगच...; ठाकरे सेनेने नगरमध्ये काय केले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ