- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यावर दुहेरी संकट ! पाऊस-उष्णतेचा जोरदार तडाखा

मुंबई / नगर सह्याद्री :
राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः दोन टोकांचे रूप धारण केले असून, एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी याबाबत सतर्कतेचा इशारा देत कोकण आणि विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. त्याचवेळी मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही तासांत हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. पुढील ३ तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस झाला, तर आंबेरी आणि मोरे गाव परिसरात तब्बल अर्धा तास गारांचा मारा झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथेही अचानक हवामान बदलले. मागील दोन दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर अवघ्या काही मिनिटांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दुसरीकडे, मराठवाड्यातील बीड जिल्हा येथे तापमानात मोठी वाढ झाली असून २४ आणि २५ एप्रिलदरम्यान तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा येथेही उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंशांपर्यंत पोहोचला आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १८ अत्याधुनिक उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

सध्याची परिस्थिती काय सांगते?
राज्यात पुढील २४ ते ४८ तास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. कोकण व विदर्भात उष्णतेची लाट कायम राहू शकते. मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील भागात अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर दुपारच्या वेळेत उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवेल, तर संध्याकाळी किंवा रात्री अचानक पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा :  राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; कोणत्या भागात पडणार पाऊस पहा

नागरिकांसाठी सूचना :
दुपारी उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलके कपडे वापरणे. वादळी पावसावेळी झाडांखाली किंवा उघड्यावर उभे राहू नये. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असं देखील सांगितलं आहे.

राज्यात “उष्णता आणि अवकाळी पाऊस” असा दुहेरी धोका निर्माण झाला असून, पुढील काही दिवस नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ