- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये धक्कादायक घटना, पुजार्‍याच्या नातवानेच फोडली मंदिराची दानपेटी

सीसीटीव्हीत चोरी चित्रबद्ध
पारनेर | नगर सह्याद्री

प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पारनेर तालुयातील पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध श्री कोरठण खंडोबा देवस्थान येथे चोरीची एक संतापजनक घटना समोर आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे २५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार मंदिराच्या पुजार्‍याच्या नातवानेच केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

१० फेब्रुवारी रोजी सकाळी मंदिरातील दानपेटी फोडण्यात आल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. दानपेटीतून रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट होताच देवस्थान समितीने तत्काळ अंतर्गत चौकशी सुरू केली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती दानपेटी फोडताना स्पष्टपणे दिसून आली. फुटेजच्या आधारे तपास केला असता, ही व्यक्ती मंदिराचे पुजारी यांचा नातू अनिकेत विकास क्षिरसागर (रा. पिंपळगाव रोठा) असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांत गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी १ मार्च रोजी देवस्थान समितीच्या विश्वस्तांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार, २ मार्च रोजी देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी अशोक घुले यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून अनिकेत क्षिरसागर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

भाविकांमध्ये संतापाची लाट
कोरठण खंडोबा देवस्थान हे अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धेने अर्पण केलेल्या दानावर पुजार्‍याच्याच नातेवाईकाने डल्ला मारल्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देवाच्या दारी असा प्रकार घडणे लेशदायक असून दोषीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या पारनेर आणि टाकळी ढोकेश्वर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  बफर स्टॉकच्या नावाखाली कांद्याचे भाव पाडण्याचा डाव; कांदा विकू नये, कोण काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ