- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ; युरियाचा साठा एकाच कृषि केंद्रावर

पुरवठा असूनही व्यवस्थापनाचा अभाव

पारनेर | नगर सह्याद्री
पेरणीच्या हंगामात अत्यावश्यक असलेल्या युरियाचा तुटवडा काही प्रमाणात दूर झाला असला, तरी त्याच्या वितरणातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्यातील केवळ एका कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा उपलब्ध झाल्याने शेकडो शेतकऱ्यांना तासनतास रस्त्यावर उभे राहून खत मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. पेरणी झालेल्या मका, बाजरी, मूग, वाटाणा तसेच इतर खरीप पिकांसाठी युरियाची तातडीची गरज असताना अनेक शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत होते. खत उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.

दरम्यान, युरियाचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच तालुक्याच्या विविध भागांतील शेतकरी आपली शेतीची कामे बाजूला ठेवून संबंधित कृषी सेवा केंद्राकडे धावले. अनेकांनी 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून केंद्र गाठले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्यांना मोठ्या रांगेचा सामना करावा लागला. सकाळपासून उभे असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना साठा संपल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागल्याची माहिती समोर आली. शेतकऱ्यांच्या मते, युरियाचा साठा उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असली तरी त्याचे वितरण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांमार्फत करण्यात आले असते तर एवढी गद आणि गैरसोय टाळता आली असती. एका केंद्रावरच संपूर्ण साठा उपलब्ध केल्यामुळे वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील खरीप हंगामाचा विचार करता युरिया, डीएपी व इतर रासायनिक खतांचा पुरेसा साठा सर्व कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध करून देणे, वितरणाचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित यंत्रणेला अधिक सक्रिय करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा :  उपबाजार समितीच्या जमीन मोजणीला ग्रामस्थांचा विरोध.... काय कारण

वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणा
खत आणि औषधांच्या विक्रीत होणाऱ्या अनियमितता, कृत्रिम टंचाई आणि संभाव्य काळाबाजार याबाबत शेतकरी संघटनांनी यापूवही चिंता व्यक्त केली होती. संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करून खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

युरियाचा साठा समान प्रमाणात उपलब्ध करून द्या
तातडीने प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा समान प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. तसेच ऑनलाईन नोंदणी किंवा टोकन पद्धतीने वाटप करून शेतकऱ्यांची होणारी गद आणि गैरसोय टाळावी तसेच वाटपात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ