नाशिक जिह्यातील इंदोरे गावात शोककळा; अख्खे कुटुंब काळाच्या उदरात
नाशिक | नगर सह्याद्री
शुक्रवारची रात्र ही नाशिकच्या दिंडोरी तालुयातील इंदोरे गावासाठी काळरात्र ठरली. दरगोडे कुटुंब एका खाजगी कार्यक्रमासाठी संध्याकाळी घराबाहेर पडले, पण ते परत आलेच नाही, गावात आली ती नऊ जणांच्या अपघाती मृत्यूची बातमी. शुक्रवारी रात्री १०-१५ च्या सुमारास दिंडोरी गावात भरधाव येणारी कार, रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहीरीत कोसळली आणि एकच कल्लोळ उडला. सुनील दत्तू दरगोडे यांच्यासह एकूण नऊ जण त्यागाडीत होते, पण पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरीत ती कार थेट खाली कोसळली आणि उरला तो फक्त आक्रोश आणि किंकाळ्या. भयाण अंधारात ही कार विहीरत पडली आणि नऊ जणांना त्या विहिरीने अक्षरश: गिळले. मोठ्ठा आवाज आला, तो ऐकताच गावात राहणार्या आजूबाजूच्या लोकांनी पटापट तिकडे धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून ते थिजलेच. विहिरत पडलेली कार वर पाच मिनिटे दिसंत होती. पण अवघ्या काही क्षणात ती पाण्यात दिसेनाशी झाली. ते पाहून सर्वांच्याच तोंडचं पाणी पळाले.
त्यातच गाडीच्या काचा बंद असल्याने आतमध्ये बसलेले लोक कारमध्येच अडकून पडले होते, त्यांचा बाहेर पडण्याचा मार्गही दुरापास्त झाला. आतमध्यल्या लोकांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला, पण त़्यांना यश मिळाले नाही. पाहता पहात विहिरतल्या पाणीरूपी काळाने त्यांना जिवत गिळलं आणि थोड्याच वेळात सगळं शातं झालं. उपस्थित स्थानिकांनी दुर्घटनेची बातमी दिल्यावर प्रशासन धडाधड कामाला लागले.
साधारण २० मिनिटांनंतर अग्निशमन दल आणि प्रशासनाचे लोक आले. विहिरीत मोठे दोरखंड लावून बचावकार्य सुरू करण्यात आलं. स्थानिकांनीही गाजीतल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. एकीकडे अग्निशमन दलाचे लोक कार्यरत असतानाच स्थानिकांनी टार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. तब्बल तीन तासांनी ही कार बाहेर काढण्यात आली. त्यावेळी कारमध्ये आठ जण होते, तर एक लहान मुलगी बाहेर विहीरीत होती.
अथक प्रयत्नांनी सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र नऊ ही लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे संपूर्ण गाव हादरलं असून इंदोरे गावार तर शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून विहीर मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विहीर ऑडिटचे आदेश; सरकारकडून मदत जाहीर
रस्त्याच्या मध्ये असलेल्या अशा प्रकारच्या विहिरींचे तात्काळ ऑडिट करून, त्याची तिथे आवश्यकता आहे का, तसेच तेथे काय उपायोजना करता येतील याबद्दलच्या सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या विहिरीचा कठडा उंच असता तर ही घटना टळली असती असेही मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी आहे, असे फडणवीस म्हणाले. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
नीरा कालव्यात मोटार कोसळून तिघांचा मृत्यू
नीरा उजवा कालव्यात मोटार कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. चालक थोडयात बचावला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने माण तालुयासह परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त मोगराळे (ता. माण) येथील रहिवासी आहेत. प्रीती टिळेकर, मंजुळा जठार अन हनुमंत जठार मोगराळे (ता. माण) यांचा मृत्यू झाला. मोगराळे (ता. माण) येथील रहिवासी सध्या मुंबई येथे वास्तव्यास होते. मुंबईहून नातेपुते परिसरात फोंडशिरसकडे जाणारी मोटार शनिवारी पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार थेट निरा उजवा कालव्यात कोसळली.










