पुणे / नगर सह्याद्री –
नसरापूर अत्याचारप्रकरणी नराधम भीमराव कांबळे याला साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. अवघ्या 52 दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून सोमवार, 29 जून जून रोजी या प्रकरणी शिक्षेवर अंतिम निकाल जाहीर केला. ‘7 मुली असलेला 65 वर्षांचा बाप हे कृत्य करूच कसं शकतो?’ असा सवाल उपस्थित करत ‘It was Cold Blooded Murder’ असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हा आरोपी पुनर्वसनाच्या पलिकडे गेलेला आहे म्हणत न्यायालयानं त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. त्यानं पुतणीवरही अत्याचार केल्याचा आरोप आहे, इतकंच नव्हे तर या आरोपीने शेळी मेंढ्यासोबतही लैंगिक अत्याचार केला आहे. ज्यामुळं तो समाजासाठी एक कलंक आहे असं न्यायालयानं कठोर शब्दांत सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये 1 मे रोजी साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती . पोलिसांनी त्या प्रकरणी भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षांच्या नराधमाला अटक केली होती. मात्र या घटनेनंतर नागरिकांचा प्रचंड असंतोष उफाळून आला होता. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत होती त्यासाठी पुण्यात आंदोलनं देखील करण्यात आली होती . त्यानंतर विक्रमी वेळेत या प्रकरणाचा तपास आणि सुनावणी पूर्ण करण्यात आलीय ज्यानंतर राखून ठेवण्यात आलेली सुनावणी आणि निकाल 29 जून रोजी न्यायालयानं जाहीर केला.
निकाल वाचनादरम्यान नेमकं काय घडलं?
विशेष सरकारी वकील अजय निसर यांनी न्यायालयात महत्त्वाते मुद्दे वाचण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये 137 पानांचं निकालपत्र वाचून दाखवताना न्यायाधीशांनी महत्त्वाचे मुद्देसुद्धा अधोरेखित करण्यात आले. सुनावणीदरम्यान बच्चन सिंह केससह अनेक महत्वपूर्ण खटल्यांसंदर्भात निकालात उल्लेख करत आजवरच्या चिमुरडी अत्याचार प्रकरणांमध्ये फाशीचीच शिक्षा झाल्याचा कोर्टाकडून आवर्जून उल्लेख केला गेला. जिथं नसरापूर प्रकरणही यातच मोडतं असं न्यायालयाचं मत. आरोपीनं थंड डोक्यानं हा गुन्हा केला असून, तो मृत्यूदंडास पात्र ठरतो असं न्यायालयानं स्पष्ट करत जितका गुन्हा गंभीर तितकी शिक्षा कठोर असावी अशी ठाम भूमिका न्यायलयानं मांडली.
हा प्लॅन करून केलेला गुन्हा असून, परिस्थिती नुसार केलेला गुन्हा असल्याचं म्हणत आरोपी जर मानसिक रुग्ण असेल तरीही गुन्हा हा गुन्हा असतो, त्यानं केलेलं कृत्य हे अमानवी आहे असं न्यायालयाचं मत. आरोपी हा विकृत वाटत असून त्याला या गुन्ह्याचा जराही पश्चाताप दिसत नाही असं न्यायालयाचं निरीक्षण. विकृत मानसिकता, निर्दयता आणि सहज स्पष्ट होतेय म्हणत It was cold blooded murder, अत्याचार केल्यानंतरचा हा गुन्हा असल्यानं आरोपीची गुन्हेगारी मानसिकता स्पष्ट होते, असं निरीक्षण न्यायालयानं स्पष्टपणे मांडलं.
अवघ्या 16 दिवसात आम्ही या खटल्याची सुनावणी पूर्ण करून आज शिक्षा देखील सुनावतोय, समाजाचा न्याय व्यवस्था वरील विश्वास टिकून राहावा, यासाठी हे पाऊल खूप महत्वाचे आहे असं म्हणत न्यायालयानं या प्रकरणातील बहुप्रतीक्षित निकाल सुनावला.
खटल्याची वैशिष्ट्य…
तपास अधिकारी असलेल्या विजयमाला पवार यांनी अवघ्या 16 दिवसांत तपास पूर्ण करून 1200 पाणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं .
या कालावधीत 55 हून जणांचे जबाब नोंदवण्यात आले आणि साक्षीपुरावे गोळा करण्यात आले .
21 मे पासून प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झाली आणि २० जूनला खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
न्यायाधीश निकाल देताना काय म्हणाले?
विशेष सरकारी वकिली यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी करताना विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल सादर/ जोडले आहेत.
हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल आहेत. आणि बऱ्याच केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे.
काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत रुपांतर केले आहे.
आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
गुन्ह्यातील आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेले परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दाखल घेण्यात आलेली आहे
पीडिता स्वतःच संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती? तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का, या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
घटनेच्यावेळी आरोपी पीडितेसोबत होता. तो तिच्यासोबत का होता याची समाधानकारक उत्तर देण्यात आरोपी अपयशी ठरला आहे.
या प्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले आहे.
आता हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडत का? हा प्रश्न आहे.
कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवत आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केलं आहे.
कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच न्यायालयाकडून स्पष्ट…
शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिषेंचे पात्र असतात.
याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते.
मुलीला टॉर्चर करण्यात आला आहे.
मुलगी helpless होती. स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केलं आहे. याने समाजाला धक्का बसला आहे.
आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता त्याची कल्पना होती की त्याला काही होणार नाही, म्हणून तो ही कृती करायला धजावला.
निर्भया प्रकरणानंतर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे.
आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत केले कृत्य केलेलं कृत्य अतिशय निर्दयी होतं. आणि त्यामुळे समाजमनावर गंभीर आजी दूरगामी परिणाम झाले आहेत.
या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती त्यांनी मुंबई बंगळूरु हायवे रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली, एवढी ही गंभीर घटना आहे.
समाजामध्ये उमटलेली प्रक्रियेचा आम्ही आदर करतो मात्र आम्हाला कायद्यानुसार चालायला हवं.
अनेक प्रकरणामध्ये चुकीचा तपास होतो कधी न्याय मिळण्यात होणारी दिरंगाई यामुळे समाजाच न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो.
याप्रकरणी 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होत
उन्हाळ्याच्या त्यानंतर कोर्टाचा पूर्ण वेळ या प्रकरणाला देण्यात आला होता.
16 दिवसात खटला पूर्ण करण्यात आला. यादरम्यान 55 साक्षीदार तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणामध्ये झालं पाहिजे. मात्र ते एक स्वप्न असेल सगळ्या प्रकरणामध्ये ते शक्य नाही.
सादर केलेल पुरावे आरोपी नेच कृत्य केल्याच सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.
पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती.
पोस्टमॉर्टममध्ये तिच्या लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल आहे.
आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे.
CCTV मध्ये आरोपी चित्रित झाला आहे.
त्याच कृत्य अमानुष आहे.
हत्येनंतर देखील त्याने तिच्या लैंगिक अत्याचार केले.
त्याने चिमुकला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही.
तिच्यावर ओरल सेक्स करण्याचा प्रयत्न केला.
त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही.
आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरी आहेच, पण फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही.
याआधी 53 वर्षांचा असताना देखील आरोपीने आपल्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती.
एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे.
तसेच त्याने आणखीनही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे.
ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस आहे.
मुलीला 18 जखमा होता. तिच्या तोंडांत 21 सेंटिमर आत कोंबण्यात आलं होतं.
मुलीने या दरम्यान सहन केलेल्या वेदना…जे काही
मुलीच्या कुटुंबीयांनी सहन केलं असेल याची कोर्टाला जाणीव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला त्यासंदर्भात ते अभिमानाचे पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे.
तपासातील सगळे अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली.
याप्रकरणी डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट, फॉरेन्सिक तज्ञांनी देखील वाखाण्याजोगी जबाबदारी पार पाडली आणि हे एक टीम वर्कचं काम आहे.
आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे.
बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉक्सो प्रकरणी फाशी
निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर
आत्ता फासावर चढा न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं…
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम
1 मे 2026 (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
2 मे 2026- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मे 2026 चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय, तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
16 मे 2026 – अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
28 मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून 2026 – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
20 जून 2026 च्या सुमारास- दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
25 जून 2026 – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.
29 जून 2026- आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली.
चिमुकलीला न्याय मिळाला; खासदार सुप्रिया सुळे
नसरापूर येथे अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) दोषी ठरविले. त्यानंतर आज (दि. २९) या घटनेचा निकाल लागला आहे. आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाचे खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वागत करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहिले की, “पुण्यातील विशेष न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्याप्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा सुनावली. अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो. ही घटना अतिशय दुर्दैवी होती. पुण्यातील विशेष न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्याप्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा सुनावली. अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो.










